State Bank of India मध्ये कोणत्याही परीक्षेशिवाय थेट नोकरीची संधी, पगार 65,000/-, जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SBI Recruitment 2025 – बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता स्टेट बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी आणि रिव्यूअर पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे या भरतीमधून नियुक्ति होऊन ऑफिसर पदावर काम करण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

स्टेट बँकेकडून (State Bank Of India) या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, तुम्हाला या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरु झाली असून पात्र उमेदवार 22 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment: PM किसान 2000 हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार – कृषी मंत्रालयाने केले जाहीर

वेतन व पात्रता (SBI Recruitment 2025)

स्टेट बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने MBA किंवा Executive MBA पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत 10 वर्षांचा कामाचा अनुभव असायला हवा. तसेच एसबीआय ईआरएस रिव्यूअर पदासाठी SMGS-IV/V ग्रेडमधून SBI/e-ABs रिटायर्ड झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

स्टेट बँकेत रिव्ह्यूवर पदासाठी 50,000 ते 65,000 रुपये वेतन दिले जाईल. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी 28-55 वयोगटातील उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. या नोकरीसाठी भरती ही कोलकत्ता येथे केली जाईल.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

Leave a Comment