नोव्हेंबर संपला! लाडक्या बहिणींना ₹1500 कधी मिळणार? वाचा सविस्तर Ladki Bahin Yojana November Installment Date

Ladki Bahin Yojana November Installment Date: आज नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तरी अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, आता नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो.

निवडणूकीनंतर मिळणार ₹1500?

राज्यात 2 आणि 3 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या काळात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. निवडणूकीनंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

agricultural loan details in marathi
कृषी कर्ज कसे मिळवावे? शेती कर्जाचे प्रकार, व्याजदर आणि सरकारी योजनांची संपूर्ण माहिती (2026) agricultural loan details in marathi

नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र येणार?

लाडकी बहीण योजनेत आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे. कदाचित महिलांना दोन्ही हप्ते एकत्रितपणे दिले जाऊ शकतात. मागच्या वर्षी विधानसभा निवडणूकीपूर्वी महिलांच्या खात्यात दोन हप्ते एकत्र देण्यात आले होते. त्यानंतर आतादेखील महिलांच्या खात्यात पैसे एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत लवकरच घोषणा केली जाईल.

केवायसीसाठी शेवटचा एक महिना (Ladki Bahin Yojana KYC Update)

लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी करण्यासाठी आता शेवटचा एक महिना उरला आहे. 31 डिसेंबरपर्यंत महिलांना केवायसी करायचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर त्यानंतरचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने केवायसी वेळेत पूर्ण करा.

Maharashtra Rain Update
24 ते 28 जून दरम्यान राज्यात तुफान पाऊस! अतिवृष्टीमुळे धरणे भरणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज Maharashtra Rain Update

➡️ बांधकाम कामगार नोंदणी; आता फक्त 1 रुपयात, मिळणार 5 लाख रुपये, नोंदणी सुरु

Leave a Comment