तुमच्या खात्यातून बँक शुल्क कट होतेय का? जाणून घ्या कोणत्या सेवांसाठी किती शुल्क आकारले जाते Bank Service Charges

Bank Service Charges – बँक सेवा शुल्काच्या नावाखाली आपल्या खात्यातून किती रक्कम कमी करते माहीती आहे का? बँका अनेक प्रकारचे चार्जेस आकारत असतात. प्रत्येक महिन्याला, वर्षाकाठी बँका खात्यातून शुल्क कमी करतात. बँक फार कमी सेवा मोफत पुरवतात. जाणून घ्या कोणत्या सेवांसाठी बँका शुल्क कपात करतात.

बँकिंग सेवेचा प्रत्येकजण आज वापर करतो आहे. जनधन योजनेमुळे आणि पोस्ट पेमेंट बँकेमुळे ग्रामीण भागातही बँकिंग सुविधा पोहचली आहे. बँका ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा पुरवतात यासाठी बँका सेवा शुल्क आकारतात. दरवर्षी अथवा दरमहा असे त्याचे स्वरुप निच्छित आहे. यामध्ये SMS सेवा, पैसे हस्तांतरण, धनादेश वटवणे, ATM मधून पैसे काढणे आणि इतर दुसऱ्या प्रकारच्या सेवांसाठी ग्राहकांकडून सेवा शुल्क आकारण्यात येते.

बँकेच्या सर्वच सेवा मोफत मिळत नसतात. बँका या सेवेपोटी ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारतात. तुम्हाला माहिती आहे का, किती प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येते? वर्षाकाठी तुमच्या खात्यामधुन कोणत्या सेवांसाठी शुल्क आकारण्यात येते?

रक्कम हस्तांतरण – प्रत्येक बँक रक्कम हस्तांतरण करण्याची सुविधा प्रदान करते. मात्र एखाद्या ठराविक मर्यादेनंतर रक्कम हस्तांतरीत करायची असेल तर त्यासाठी सेवा शुल्क आकारते. साधारणपणे सरकारी बँका या सेवेसाठी 20 ते 100 रुपयांपर्यंत शुल्क घेऊ शकतात.

7/12 Utara Discontinued Maharashtra
सातबारा उतारा बंद होणार, पहा सरकारचा निर्णय 7/12 Utara Discontinued Maharashtra

कमीतकमी शिल्लक – मिनिमम बॅलन्स या प्रकारातून बँका तुमच्या खात्यात एक आमूक रक्कम उपलब्ध नसेल तर, बॅलन्स नसल्याचे कारण समोर करत मुळातच कमी असलेल्या रक्कमेतून दरमहा रक्कम कमी करतात. ग्राहकांचा खिसा कापण्याचे बँकांचे हे सर्वात सोपे साधन आहे.

IMPS शुल्क – अनेक बँका ग्राहकांना NEFT आणि RTGS व्यवहार मोफत देतात. मात्र काही बँका IMPS व्यवहारावर शुल्क आकारतात. हे शुल्क 1 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत असू शकते.

धनादेश वटवणे – जर तुमचा धनादेश 1 लाख रुपयांपर्यंत असेल तर बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारत नाही. पण त्यापेक्षा अधिक रक्कमेचा चेक असल्यास शुल्क आकारले जाते. हे शुल्क 150 रुपयांपर्यंत असू शकते.

ATM व्यवहार – एटीएममधून रक्कम काढण्यासाठी बँकांनी काही वर्षांपूर्वी एक मर्यादा निश्चित केली आहे. त्या मर्यादेपर्यंत रक्कम काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यानंतरच्या व्यवहारासाठी 20-50 रुपयांपर्यंतचे शुल्क आकारले जाते.

Maharashtra SSC Result 2026
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल – येथे पहा Live Result

SMS शुल्क – तुमच्या खात्यामधील व्यवहारासंबंधीची माहिती अपडेट करण्यासाठी, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच अलर्ट मॅसेज यासाठी बँका SMS शुल्क आकारत असतात.

कार्ड बदल – तुमचे डेबिट कार्ड हरवल्यास किंवा दुसरे कार्ड घ्यायचे असल्यास बँका शुल्क आकारतात. हे शुल्क 50 रुपये ते 500 रुपयांपर्यंतचे असते. प्रत्येक बँकेने या संबंधिचे शुल्क निर्धारीत केले आहे.

Leave a Comment