लाडकी बहीण e-KYC: पती, वडील नाहीत; अशी करा KYC Ladki Bahin Yojana e-KYC new update

Ladki Bahin Yojana e-KYC new update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पूर्वीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती, परंतु अनेक महिलांची केवायसी अपूर्ण राहिल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे.

मुदतवाढ का देण्यात आली? (मुख्य कारणे)

राज्यातील अनेक महिलांना वेळेत e-KYC करता आली नाही कारण;

• अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती
• पोर्टलवर तांत्रिक बिघाड
• OTP न येणे
• सर्व्हर वारंवार डाऊन होणे

या सर्व अडचणींचा विचार करून सरकारने मुदतवाढ दिली.

पुढील परिस्थितीत असलेल्या महिलांनी e-KYC प्रक्रिया अशी पुर्ण करा

ज्या महिलांसंबंधी खालील परिस्थिती आहे, त्यांच्यासाठी केवायसी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे;

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

1️⃣ पती किंवा वडील हयात नाहीत

• लाभार्थी महिलेने फक्त स्वतःच्या आधार OTPने e-KYC ची पहिली स्टेप पूर्ण करावी

1) वेबसाइट उघडा: https://ladakibahin.maharashtra.gov.in
2) मुख्य पृष्ठावर ‘e-KYC’ बॅनरवर क्लिक करा.
3) आधार क्रमांक + कॅप्चा भरून ‘Send OTP’ वर क्लिक करा
4) आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका ‘Submit’ करा

• त्यानंतर ‘वडिल किंवा पती’ यांच्या आधार OTP ची दुसरी स्टेप पुर्ण न करता अर्धवट KYC ठेवावी
• मृत्यू प्रमाणपत्राची प्रत ‘संबंधित अंगणवाडी सेविका’ किंवा तालुक्यातील ‘महिला व बालविकास कार्यालयात’ जमा करावी

2️⃣ घटस्फोट झालेला आहे

• लाभार्थी महिलेने फक्त स्वतःच्या आधार OTPने e-KYC ची पहिली स्टेप पूर्ण करावी

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

1) वेबसाइट उघडा: https://ladakibahin.maharashtra.gov.in
2) मुख्य पृष्ठावर ‘e-KYC’ बॅनरवर क्लिक करा.
3) आधार क्रमांक + कॅप्चा भरून ‘Send OTP’ वर क्लिक करा
4) आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका ‘Submit’ करा

• त्यानंतर ‘वडिल किंवा पती’ यांच्या आधार OTP ची दुसरी स्टेप पुर्ण न करता अर्धवट KYC ठेवावी
• न्यायालयीन घटस्फोट आदेशाची प्रत ‘संबंधित अंगणवाडी सेविका’ किंवा तालुक्यातील ‘महिला व बालविकास कार्यालयात’ जमा करावी

मुदतवाढीमुळे लाभार्थ्यांना मिळणारे फायदे

• योजनेचे पैसे बंद होणार नाहीत
• सर्व पात्र महिलांना हक्काचा लाभ मिळेल
• कोणतीही महिला तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहणार नाही

➡️ मोफत 3 गॅस सिलेंडर अनुदान खात्यात जमा; सर्वांसाठी आनंदाची बातमी

Leave a Comment