‘पीएम किसान’चे 2000 जमा व्हायला सुरुवात, तुमचे आले का? असे तपासा PM Kisan Payment Status Check

PM Kisan Payment Status Check: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) अंतर्गत 21वा हप्ता आज (ता.19) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोयंबतूर, तमिळनाडू येथून दुपारी 1 वाजता थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे हा हप्ता वितरित करतील.

राज्यातील 90.41 लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1808 कोटींचा निधी जमा होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे.

कोणाला मिळणार लाभ?

PM Kisan हप्ता मिळण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण करणे बंधनकारक आहे:

• अभिलेख नोंदणी (Record Updation) अद्यावत असणे
• बँक खाते आधारशी लिंक असणे
• ई-KYC पूर्ण असणे
• बँक खाते सक्रिय असणे

ज्या शेतकऱ्यांनी हे सर्व अपडेट केले नसेल, त्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही.

PM Kisan चा हप्ता जमा झाला का? असे तपासा

सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता जमा झाला की नाही, हे तपासण्यासाठी अधिकृत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

चेक करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत;

1. अधिकृत वेबसाइटवर जा: pmkisan.gov.in
2. होमपेजवर ‘Farmers Corner’ या विभागावर क्लिक करा
3. त्यामध्ये ‘Beneficiary Status’ किंवा ‘Know Your Status’ निवडा
4. तुमचा ‘Registration Number’ किंवा ‘Aadhaar Number’ टाका
5. ‘Get Data’ बटणावर क्लिक करा

यानंतर तुम्हाला खालील माहिती दिसेल:

• हप्ता जमा झाला की नाही
• पेमेंट स्थिती (Success/Failed/Pending)

• पेमेंट न मिळण्याची कारणे;

• e-KYC Not Done
• Bank Account Not Linked
• Payment Failed
• FTO Processed But Payment Pending

त्रुटी आढळल्यास काय करावे?

जर स्थितीवर कोणतीही त्रुटी दिसली तर:

• जवळच्या CSC/सेवा केंद्रात जाऊन सुधारणा करावी

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

• कृषी विभागाशी संपर्क साधावा

• e-KYC तात्काळ करून घ्यावी

यामुळे पुढील हप्ता वेळेत मिळण्यास मदत होईल.

➡️ लाडकी बहीण योजना eKYC मुदत वाढली; आता या तारखेपर्यंत करा KYC

Leave a Comment