पीएम किसान 21 वा हप्ता 2000 रुपये तारीख फिक्स PM Kisan 21st Installment Date

PM Kisan 21st Installment Date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये एकूण 6000 रुपयांचे सहाय्य दिले जाते. प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

21 व्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली

गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी 21 व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. बिहार विधानसभा निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे या हप्त्याचे वितरण पुढे ढकलले गेले होते.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

बिहार निवडणुका संपल्यानंतर घोषणा

बिहार निवडणुका पूर्ण झाल्यानंतर अखेर अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. PM Kisan installment release date

21 वा हप्ता कधी जमा होणार?

पीएम किसानच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवरून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, येत्या 19 नोव्हेंबर रोजी 21 व्या हप्त्याचे पैसे देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या हप्त्याचा फायदा देशभरातील जवळपास नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

अधिकृत घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये उत्साह

योजनेबाबत मिळालेल्या या अधिकृत अपडेटनंतर शेतकरीवर्गामध्ये मोठी उत्सुकता आणि समाधान निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा हप्ता वेळेवर मिळणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

➡️ तुम्हाला हफ्ता मिळणार की नाही, असे तपासा?

Leave a Comment