Ration Card Online Download: स्मार्ट रेशन कार्ड; जुने रेशन कार्ड बंद, नवीन रेशनकार्ड असे करा डाऊनलोड

Ration Card Online Download: केंद्र सरकारने देशभरातील रेशन वितरण व्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी स्मार्ट रेशन कार्ड प्रणाली लागू करण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक कागदी रेशन कार्ड आता हळूहळू बंद केली जात असून, प्रत्येक लाभार्थ्याकडे आता स्मार्ट रेशन कार्ड असणे अनिवार्य ठरणार आहे. या आधुनिक कार्डमुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य आणि अनुदानित वस्तू सहज उपलब्ध होणार आहेत.

Ration Card Online Download

‘मेरा रेशन’ (Mera Ration) हे भारत सरकारचे अधिकृत ॲप आहे, जे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा एक भाग आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमचे स्मार्ट रेशन कार्ड, लाभाची माहिती, स्थानांतरित रेशन सेवा (One Nation, One Ration Card) यासंबंधी सर्व माहिती मोबाईलवरच पाहू शकता. विशेष म्हणजे, हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपे असून तुम्ही अवघ्या दोन मिनिटांत तुमचे नवीन रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता.

असे करा स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड

तुमचे स्मार्ट रेशन कार्ड मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खालील सोपी पद्धत वापरा:

1. सर्वप्रथम Google Play Store वर जा आणि ‘Mera Ration’ हे ॲप डाउनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.

2. ॲप उघडल्यानंतर, ‘Beneficiary User’ (बेनिफिशरी युजर) या पर्यायावर टॅप करा.

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

3. आता लॉगिनसाठी तुमचा आधार क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा Captcha Code भरा.

4. पुढे ‘Login with OTP’ या बटणावर क्लिक करा.

5. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला 6 अंकी OTP टाकून व्हेरिफाय करा.

6. एकदा व्हेरिफिकेशन पूर्ण झाले की, तुमचे नवीन स्मार्ट रेशन कार्ड स्क्रीनवर दिसेल.

7. खाली दिसणाऱ्या Download (बाणाच्या चिन्हावर) क्लिक करा.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

8. काही सेकंदांतच तुमचे कार्ड PDF स्वरूपात मोबाईलमध्ये सेव्ह होईल.

स्मार्ट रेशन कार्डचे फायदे

• डिजिटल स्वरूपामुळे कार्ड हरवण्याची भीती नाही.
• घरबसल्या काही मिनिटांत डाउनलोड करून सेव्ह करता येते.
• लाभार्थ्याचे नाव, RC नंबर, व कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती मिळते.
• “One Nation, One Ration Card” अंतर्गत देशभर कुठेही रेशन मिळवणे शक्य.

Ration Card Online Download

सरकारच्या या उपक्रमामुळे रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुलभता वाढली आहे. त्यामुळे अजूनही ज्यांनी त्यांचे स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड केले नाही, त्यांनी आजच ‘Mera Ration App’ इन्स्टॉल करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. काही मिनिटांतच तुमचे डिजिटल रेशन कार्ड तयार होईल आणि तुम्ही सरकारी योजनांचा लाभ अधिक सोयीस्करपणे घेऊ शकाल

➡️ लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी मुदत वाढणार, अदिती तटकरे यांनी दिली माहिती

Leave a Comment