Gharkul Yadi 2025: घरकुल योजना 2025 यादी जाहीर! तुमचं नाव आहे का? मोबाईलवर ताबडतोब तपासा

Gharkul Yadi 2025: घरकुल योजना ही गरीब आणि गरजू लोकांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे. 2025 साठी या योजनेची नवी लाभार्थी यादी जाहीर झाली आहे. या योजनेत त्याच लोकांचा समावेश होतो ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश केला आहे. ज्यांची निवड होते त्यांना सरकारकडून घर बांधण्यासाठी पैसे दिले जातात.

घरकुल यादी 2025 मोबाईलवर कशी पाहावी?

ही यादी तपासणे आता अगदी सोपे आहे. यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी मोबाईलवर खालील पद्धत वापरा –

• सर्वप्रथम pmayg.nic.in/netiayHome/home.aspx ही सरकारी वेबसाइट उघडा.
• त्यानंतर AwaasSoft या पर्यायावर क्लिक करा.
• पुढे Reports या विभागात जाऊन Beneficiary details for verification हा पर्याय निवडा.
• आता राज्य निवडा, नंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव टाका.
• सगळी माहिती भरल्यानंतर Submit बटण दाबा.

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

तुम्हाला काय माहिती मिळेल?

यानंतर स्क्रीनवर तुमची माहिती दिसेल. त्यात अर्ज क्रमांक, तुमचे नाव, जात प्रवर्ग आणि प्राधान्यक्रम अशी माहिती असेल. जर तुमचे नाव यादीत आले असेल, तर लवकरच घर बांधण्यासाठी सरकारकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल.

महाराष्ट्र सरकारने 2025 साठी मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षी राज्यात 33 लाखांपेक्षा जास्त घरकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी आधी अर्ज केला आहे आणि ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही, त्यांनाही लवकरच या योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे.

➡️ ई-पीक पाहणी यादी 2025: असे पहा यादीमध्ये आपले नाव

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

Leave a Comment