Ration Card eKYC Update: मोठी बातमी! राज्यातील दीड कोटी लाभार्थींचे धान्य बंद; ई-केवायसी न केल्यामुळे सरकारची मोठी कारवाई – तुमचा लाभ सुरु आहे का?

Ration Card eKYC Update: महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत (NFSA) मोफत धान्याचा लाभ घेत असलेल्या 1 कोटी 44 लाख 89 हजार 715 लाभार्थ्यांचे धान्य तात्पुरते बंद करण्यात आले आहे. यामागचे कारण म्हणजे, या लाभार्थ्यांनी अजूनही ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाने कठोर निर्णय घेत, या लाभार्थ्यांना रेशन दुकानांमार्फत धान्य देण्यास तात्पुरती थांब दिली आहे

ई-केवायसी का आहे इतकी महत्त्वाची?

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत देशभरात करोडो गरीब व गरजूंना दरमहा मोफत धान्य वितरित केले जाते. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातही अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांसाठी रेशन कार्डाच्या आधारे धान्य वितरण केले जाते. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खोट्या लाभार्थ्यांची छाटणी करण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. ई-केवायसीच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याची ओळख सुनिश्चित होते, जेणेकरून फक्त पात्र व्यक्तींनाच धान्याचा लाभ मिळेल. शासनाने यासाठी तब्बल 6 ते 7 वेळा मुदतवाढ दिली, मात्र तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही

सांख्यिकीवर एक नजर

• महाराष्ट्रात एकूण लाभार्थी: 6 कोटी 84 लाख 12 हजार 192
• नोंदणी पूर्ण केलेले: 3 कोटी 73 लाख 87 हजार 119
• नोंदणी केली पण प्रक्रिया अपूर्ण: 1 कोटी 65 लाख 35 हजार 358
• नोंदणीच न केलेले: 1 कोटी 44 लाख 89 हजार 715 (यांचे धान्य बंद)

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

ई-केवायसीसाठी जुलैअखेरपर्यंतची शेवटची मुदत होती. तरीदेखील जवळपास दीड कोटी लाभार्थ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि आता त्यांना रेशनपासून वंचित राहावे लागणार आहे

ठाणे आणि नाशिक विभागांची कामगिरी उल्लेखनीय

संपूर्ण राज्यात सर्वाधिक ई-केवायसी नोंदणी ठाणे विभागात झाली आहे. येथे तब्बल 85.87% लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी आहे नाशिक, जिथे 38.5 लाख पैकी 33 लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी (85.76%) नोंदणी पूर्ण केली आहे. तर दुसऱ्या बाजूला, सिंधुदुर्ग जिल्हा मात्र सर्वात मागे आहे. येथे फक्त 71.59% लाभार्थ्यांनीच ई-केवायसी केली आहे

रेशनकार्ड लाभार्थ्यांनी आता काय करावे?

सरकारने रेशन बंद केल्याने अनेकांना मोठा फटका बसणार आहे. मात्र, हे धान्य कायमस्वरूपी बंद केलेले नाही. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना पुन्हा धान्य मिळण्यास सुरुवात होईल. म्हणूनच, ज्या नागरिकांनी अजूनही ई-केवायसी केली नाही, त्यांनी त्वरित नजीकच्या आधार केंद्रात जाऊन किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी पूर्ण करावी, अन्यथा त्यांना पुढेही या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

Ration Card eKYC Update

शासनाच्या या निर्णयामागचा हेतू फसव्या लाभार्थ्यांना गाळून योग्य लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा आहे. पण, या प्रक्रियेत अनेक गरजू आणि अशिक्षित लोकांनाही नुकसान होण्याची शक्यता आहे, जे तांत्रिक अडचणींमुळे ई-केवायसी करू शकले नाहीत. त्यामुळे शासनाने या साठी विशेष मोहिमा राबवून, जनजागृती करून, सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या, जे लोक अजूनही लाभ चालू ठेऊ इच्छितात, त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, हीच विनंती!

➡️ तुमची रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण झाली आहे किंवा नाही? असे मोबाईलवरुन पहा 2 मिनिटांत

Leave a Comment