तुमच्या रेशन कार्डचा रंग कोणता? जाणून घ्या रंगानुसार मिळणारे फायदे Ration Card Color and Benefits

Ration Card Color and Benefits – केंद्र सरकारने आज सर्वसामान्यांच्या हितासाठी अनेक सरकारी योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेअंतर्गत लोकांना आर्थिक आणि अनेक प्रकारची मदत केली जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत केंद्र सरकार सर्वसामान्यांना कमी दरात मोफत रेशन पुरवते. याचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. सरकारकडून वेगवेगळ्या रंगात रेशनकार्ड दिले जातात. या शिधापत्रिकांचे वेगवेगळे फायदे आहेत.

रेशन कार्ड किती रंगाचे आहेत?

भारत सरकार चार वेगवेगळ्या रंगांमध्ये रेशनकार्ड पुरवते. हे रेशनकार्ड ओळखपत्र म्हणूनही तुम्ही वापरू शकता. रेशन कार्डचा रंग त्याच्याशी निगडित फायद्यांविषयी सांगतो. याबद्दल येथे सविस्तर माहिती घेऊ.

गुलाबी किंवा लाल रेशन कार्ड

गुलाबी किंवा लाल शिधापत्रिका बहुतेक दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या कुटुंबांना दिली जाते. या रेशन कार्डअंतर्गत एखादी व्यक्ती सामान्य किमतीमध्ये रेशन घेऊ शकते. याशिवाय या रेशनकार्डच्या माध्यमातून अनुदानही मिळते. या शिधापत्रिकेअंतर्गत उज्ज्वला आणि गृहनिर्माण योजनेचा लाभ घेता येतो.

पिवळे रेशन कार्ड

दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना हे रेशनकार्ड दिले जाते. याअंतर्गत गहू, तांदूळ, डाळी, साखर सामान्य दरापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करता येते. त्याचबरोबर कोणत्याही योजनेत या रेशनकार्डला प्राधान्य दिले जाते.

पांढरे रेशन कार्ड

जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना पांढरे रेशनकार्ड दिले जाते. हे असे लोक आहेत जे अन्नधान्यासाठी सरकारी योजनांवर अवलंबून नाहीत. हे कार्ड सामान्यत: पत्ता किंवा ओळखपत्रासाठी वापरले जाते. त्याचबरोबर काही सरकारी योजनांचा लाभ या कार्डच्या माध्यमातून घेता येतो.

Sarkari Loan Yojana 2026
सरकारच्या 5 सर्वोत्तम कर्ज योजना: बिनव्याजी आणि मोठ्या सबसिडीवर मिळवा कर्ज! Sarkari Loan Yojana 2026

निळे किंवा केशरी रेशन कार्ड

जे लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना हे रेशनकार्ड दिले जाते. परंतु हे लोक बीपीएल किंवा दारिद्र्य रेषेच्या यादीत येत नाहीत. या लोकांना गहू, तांदूळ इत्यादी अन्नधान्यही सामान्यपेक्षा कमी किमतीत मिळते. तर काही राज्यांमध्ये या शिधापत्रिकांना पाणी आणि विजेवर ही सवलत मिळते.

शिधापत्रिकेमध्ये नाव जोडण्यासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया फॉलो करा

> शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव ऑनलाईन जोडण्यासाठी तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

> यानंतर तुम्हाला एक आयडी तयार करावा लागेल. जर तुमचा आयडी आधीच तयार असेल तर लॉगिन करा.

> लॉगिन केल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिकेबद्दल माहिती/ पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला नवीन मेंबर ॲड करण्याचा पर्याय पाहायला मिळेल. त्या पर्यायावर जा आणि नवीन सदस्य जोडण्यासाठी फॉर्म भरा.

> त्यासोबतच नव्या सदस्याची संपूर्ण माहिती भरा. सदस्याचा फॉर्म भरून झाल्यावर त्या व्यक्तीची कागदपत्रे अपलोड करा.

Aaple Sarkar Seva Kendra School Camp GR 2026
आपले सरकार सेवा केंद्रामधून मिळणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यांबाबत शासन निर्णय Aaple Sarkar Seva Kendra School Camp GR 2026

> संपूर्ण माहिती भरल्यानंतर डॉक्युमेंटेशन केल्यानंतर फॉर्म सबमिट करा

> फॉर्म सबमिट नंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. नोंदणी क्रमांकासह तुमची विनंती तुम्ही यामध्ये ट्रॅक करू शकता.

> यानंतर तुमचा फॉर्म आणि तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. सर्वकाही बरोबर असल्यास नवीन सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये जोडले जाईल.

> तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन देखील आपल्या शिधापत्रिकेमध्ये नाव अपडेट करू शकता.

Leave a Comment