ration card ekyc status check online: आजच्या डिजिटल युगात रेशन कार्ड ई-केवायसी (eKYC) ही एक महत्त्वाची प्रक्रिया बनली आहे. सरकारी अन्नधान्य लाभ (PDS) योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकाने आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुमचं ई-केवायसी अद्याप पूर्ण नसेल, तर रेशनवर अन्नधान्य मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच, खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून तुमचं ई-केवायसी (ration card ekyc) पूर्ण आहे का? घरबसल्या सहज तपासू शकता
How to Check Ration Card eKYC Status Online
ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर (Electronic Know Your Customer) यामध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बायोमेट्रिक माहिती यांचा उपयोग करून लाभार्थ्याची ओळख पडताळली जाते
मोबाईलवरून रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण आहे का, हे कसे तपासावे?
• मेरा ई-केवायसी (Mera eKyc) ॲप Play Store वरुन डाउनलोड (Install) करा
• App उघडा नंतर भाषा निवडा
• तुमचे राज्य निवडा
• त्यानंतर ‘Verify Location’ वर क्लिक करा
• तुमचा आधार नंबर टाका आणी ‘Generate OTP’ वर क्लिक करा
• मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका, कॅप्चा कोड टाका आणी ‘Submit’ वर क्लिक करा
• त्यानंतर तुमची Beneficiary Details दिसेल. त्यामध्ये eKyc Status दाखवला जाईल.
• तुमचा ई-केवायसी स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
• “eKYC Completed” असे दिसल्यास, प्रक्रिया पूर्ण आहे.
• “eKYC Pending” किंवा “Not Completed” असे दिसल्यास, प्रक्रिया पूर्ण करणे बाकी आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी काय करावे?
जर ई-केवायसी पूर्ण नसेल, तर पुढील पर्यायांपैकी एक वापरू शकता:
1. नजीकच्या रेशन दुकानात भेट द्या:
• तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर घेऊन जा.
• बायोमेट्रिक पद्धतीने eKYC पूर्ण करता येते.
2. तलाठी / ग्रामसेवक किंवा CSC केंद्रामार्फत:
• जवळच्या CSC (Common Service Center) वरही ही सेवा उपलब्ध आहे.
3. मेरा eKyc App वापरून मोबाईल वरुन पूर्ण करता येते.
टीप: link aadhaar with ration card online
• ई-केवायसी करण्यासाठी आधार कार्डावर मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
• जर आधारशी मोबाईल लिंक नसेल, तर आधी ते अद्यतनित करावे.
ration card ekyc check mobile
रेशन कार्ड ई-केवायसी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, ती वेळेत पूर्ण केली नाही तर सरकारी लाभ मिळण्यात अडथळा येऊ शकतो. वरील पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून सहजपणे तपासू शकता की ई-केवायसी पूर्ण आहे का. आणि पुर्ण नसल्यास तात्काळ ती प्रक्रिया पूर्ण करावी.