Smartphone Charging Limit Expert Advice: तुम्ही तुमचा स्मार्टफोन 100% चार्जिंग करता का? जर हो तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचे आयुष्य कमी करत आहात. आपल्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त वेळ टिकावी असे प्रत्येकाची इच्छा असते. पण काही फोनच्या बॅटरी काढता येत नाहीत. या कंपन्या पाच वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट देत असतात. पण बॅटरी तिथपर्यंत जाते का? हा देखील प्रश्न आहे.
तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त वेळ चांगली ठेवायची असेल तर काही खास स्मार्टफोन Android आणि iOS यांनी बॅटरी चार्जिंग 80% पर्यंत ठेवण्याचा पर्याय दिला आहे. वापरकर्त्यांना हे अनावश्यक आहे असे वाटू शकते. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बॅटरी जास्त वेळ चांगली राहण्यासाठी हे फायदेशीर आहेत.
स्मार्टफोनची बॅटरी 80% पर्यंत चार्जिंग करण्याचे फायदे
बॅटरीचे आयुष्य कमी होण्याची दोन मुख्य कारणे आहेत
1.तापमान – तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त वेळ चार्जिंग करत असाल तर, जास्त बॅटरी चार्जिंग होणाऱ्या प्रक्रियेमध्ये बॅटरीचे तापमान वाढते. यासाठी तुमच्या स्मार्टफोनला जास्त तापमान मिळणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे बॅटरी जास्त चांगली राहील. त्यामुळे फोन चार्जिंग करताना फोन वापरणे टाळा.
2.व्होल्टेज – व्होल्टेज वाढल्याने बॅटरीवरील ताण वाढतो त्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होऊ लागते, बॅटरी चार्जिंग करताना प्रत्येकवेळी हे होत असते. आपला फोन 60% पर्यंत जलद चार्जिंग होत असतो पण, ज्यावेळी ही मर्यादा 80% वरती जाते तेव्हा चार्जिंग होण्याची प्रक्रिया कमी होत जाते. तरीदेखील कधीकधी 100% चार्ज करणे हे हानिकारक नाही. परंतु वारंवार 100% चार्जिंग केल्यामुळे बॅटरी होल्टेज ताण वाढून बॅटरीचे आयुष्य कमी होत असते.
80% पर्यंत चार्ज मर्यादित करणे म्हणजे काय?
80% पर्यंत तुम्ही तुमच्या बॅटरी चार्जिंग करण्याचे लिमिट सेट केले तर, यामुळे बॅटरीवर येणाऱ्या व्होल्टेज ताणाचा वेग मंदावेल. त्यामुळे तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढायला मदत होईल.
आपल्या स्मार्टफोनवर चार्ज लिमिट कसे सेट करावे?
तुम्ही आपल्या स्मार्टफोनवर बॅटरी चार्ज मर्यादा सेट करण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरू शकता.
सॅमसंग डिव्हायसवर : ‘Settings’ मध्ये जा ‘Battery’ पर्याय निवडा, ‘Battery Protection’ वर टॅप करून चार्ज लिमिट सेट करा.
वनप्लस डिव्हायसवर : ‘Battery Health’ मध्ये जा, आणि चार्ज लिमिट सेट करा.
आयफोनवर : ‘Optimized Battery Charging’ डिफॉल्टने सेट असतो, पण तुम्ही ‘Settings → Battery → Charging’ मध्ये जाऊन तुम्हाला चार्ज लिमिट सेट करता येईल.