SBI की HDFC… कोणत्या बँकेचे Home Loan फायदेशीर? 30 लाखांचे Home Loan 15 वर्षासाठी घेतल्यास जाणून घ्या मासिक EMI किती येईल!

SBI Vs HDFC Home Loan : प्राईम लोकेशनवर घर असावे असे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल. मात्र मोक्याच्या ठिकाणी घर घ्यायचे म्हणजे लाखो रुपयांचा खर्च हा येतोच. जर तुम्ही देखील होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करणार असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. SBI आणि HDFC या दोन प्रमुख बँकांच्या गृह कर्जाच्या व्याजराची आज आपण येथे तुलना करणार आहोत. यामधून तुम्हाला कोणत्या बँकेचे गृह कर्ज तुमच्यासाठी फायदेशीर आहे याची कल्पना येईल.

जमिनीच्या आणि घरांच्या कीमती अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे स्वतःचे घर घेणे किंवा जमीन, निवासी प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे अवघड होत चालले आहे. प्राईम लोकेशनवर घर असावे असे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल. परंतु मोक्याच्या ठिकाणी घर घेण्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांचा खर्च येतो. प्रत्येकजण लाखो रुपयांचा खर्च करून घराचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. याच कारणामुळे अनेकजण होम लोन हा पर्याय निवडून घराचे स्वप्न पूर्ण करत असतात.

SBI बँकेचा गृह कर्जासाठी व्याजदर किती आहे

SBI देशामध्ये सर्वात मोठी सरकारी बँक आहे. सध्या ही आपल्या ग्राहकांना 8.25% व्याज दरामध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. हा बँकेचा किमान व्याजदर आहे. ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना या कर्जाचा लाभ मिळू शकतो.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या 3 प्रमुख योजना Top 3 Govt Schemes for Farmers 2026

ज्यांचा सिबिल स्कोर 800 च्या आसपास आहे अशा लोकांना SBI कडून 8.25% इंटरेस्ट रेटवर होम लोन मिळू शकते. एखाद्या ग्राहकाला किमान 8.25% इंटरेस्ट रेटवर 30 लाख रुपयापर्यंत 15 वर्षांसाठी गृह कर्ज मंजूर झाले तर त्या ग्राहकाला मासिक हप्ता 29 हजार 104 रुपयांचा भरावा लागेल. म्हणजे त्या व्यक्तीला 22 लाख 38 हजार 758 रुपये इतके व्याज स्वरूपामध्ये द्यावे लागतील. आरबीआय नुसार सर्वात सुरक्षित बँकेच्या यादीमध्ये एसबीआय बँक आहे.

HDFC बँकेचा गृह कर्जासाठी व्याजदर किती आहे

HDFC हि देशामधील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. आरबीआयने या बँकेला देखील सर्वात सुरक्षित बँकेचा दर्जा दिलेला आहे. HDFC आपल्या ग्राहकांना 8.75% इंटरेस्ट रेटवर गृह कर्ज देत आहे. हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे. ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोर चांगला आहे त्यांना या गृह कर्जाचा लाभ मिळू शकतो.

एखाद्या ग्राहकाला 8.75% इंटरेस्ट रेटवर 30 लाख रुपयांचे गृह कर्ज हे 15 वर्षांसाठी मंजूर झाले तर त्या ग्राहकाला मासिक हप्ता 39 हजार 983 रुपये इतका भरावा लागेल. म्हणजे त्या व्यक्तीला फक्त व्याज म्हणून बँकेला 23 लाख 97 हजार 23 रुपये इतके द्यावे लागतील.

Ganpati Aarti Sangrah Marathi
गणपती आरती संग्रह | सर्व महत्वाच्या आरत्या आणि प्रार्थना एकाच ठिकाणी | Ganpati Aarti Sangrah Marathi

Leave a Comment