Airtel नंतर जिओचा इलॉन मस्कच्या SpaceX सोबत करार, देशात सुरु होणार सॅटेलाईट हायस्पीड इंटरनेट सेवा

Jio-SpaceX Satellite Internet in India
– मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने भारतामध्ये स्टारलिंकची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी करार केला आहे. या करारानंतर भारतामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागांसहित देशभरामध्ये उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होणार आहे. यामुळे दुर्गम भागासारख्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी प्रदान करणे सहज सोपे होणार आहे. याआधी स्पेसएक्स सोबत एअरटेल या कंपनीने हा करार केला आहे.

जिओ आणि स्पेसएक्स मधील या करारामुळे दोन्ही कंपन्यांना सॅटेलाइट इंटरनेट सेवा प्रदान करण्यास मदत होणार आहे. यामध्ये जिओ आपल्या रिटेल आऊटलेट्स आणि ऑनलाइन स्टोअरफ्रंट द्वारे सेवा प्रदान करणार आहे. आपल्या फिजिकल स्टोअरमध्ये स्टारलिंक उपकरणे आणि ग्राहक सेवा सुरू करण्याची रिलायन्सची योजना आहे.

7/12 Utara Discontinued Maharashtra
सातबारा उतारा बंद होणार, पहा सरकारचा निर्णय 7/12 Utara Discontinued Maharashtra

या करारामधील जिओ ही जगामधील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर आहे, तर स्टारलिंक जगातील आघाडीची लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाईट कॉन्स्टेलेशन ऑपरेटर आहे. याआधी काही दिवसापूर्वीच एअरटेलने देखील स्टारलिंकसोबत सहकार्याची घोषणा केलेली आहे. विशेष म्हणजे स्टारलिंकचे भारतामध्ये फक्त दोनच प्रमुख स्पर्धक आहेत, आणि या दोघांसोबत स्टारलिंकने हात मिळवणी केली आहे.

या करारामुळे ग्राहकांना फायदा मिळणार का?

स्टारलिंक सोल्युशन जिओ ग्राहकांना जिओ स्टोअर्समध्ये आणि ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. जिओने याबाबत आपल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, स्पेसएक्ससोबतच्या करारामुळे भारतामधील सर्व उद्योग, लघु मध्यम व्यवसाय आणि समुदायांना विश्वसनीय इंटरनेट सुविधा मिळण्यास मदत होईल. स्टारलिंक जलद आणि परवडणाऱ्या मार्गाने सर्वात आव्हानात्मक ठिकाणी हाय स्पीड इंटरनेटचा विस्तार करून JioAirFiber आणि JioFibe ला पूरक  ठरणार आहे. तसेच दोन्ही कंपन्या देखील भारताच्या डिजिटल इकोसिस्टीममध्ये सहकार्यासाठी इतर मार्ग शोधतील.

Maharashtra SSC Result 2026
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल – येथे पहा Live Result

याआधी एअरटेलने स्पेसएक्ससोबत सहकार्याची घोषणा केली आहे

जिओआधी भारती airtel ने देखील भारतामध्ये इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत हातमिळवणी करण्याची घोषणा केली आहे. जिओ आणि एअरटेल सोबतच्या या भागीदारीमुळे स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट भारतामध्ये येईल. भारतामधील स्टारलिंकचे जिओ आणि एअरटेल हे मुख्य स्पर्धक आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये या दोघांशी हातमिळवणी करून इलॉन मस्क यांनी भारतामध्ये कंपनीचा पाया भक्कम करण्याचा मार्ग मोकळा केल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment