फोन पे देत आहे 5 लाख रूपयांचे कर्ज 10 मिनिटांत, पहा प्रोसेस PhonePe Personal Loan Apply 2025

PhonePe Personal Loan: जर तुम्हाला अचानक कर्जाची गरज भासली तर तुम्ही फोनपे द्वारे वैयक्तिक कर्ज (PhonePe Personal Loan) घेऊ शकता. फोनपेचा वापर केवळ डिजिटल व्यवहारांसाठीच नाही तर कर्ज घेण्यासाठी देखील केला जातो. फोनपे द्वारे तुम्ही जास्तीत जास्त 5,00,000 पर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.

How to apply for personal loan in PhonePe

घेतलेले कर्ज परत करण्याचा कालावधी 3 महिन्यांपासून कमाल 5 वर्षांपर्यंत असतो. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक गरजांसाठी PhonePe कडून कमी व्याजदराने कोणत्याही अधिकच्या कागदपत्रांशिवाय फक्त 10 ते 15 मिनिटांत वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.

कोणत्या कंपन्या कर्ज देतात आणि व्याजदर किती?

फोन पे हे एक ऑनलाइन व्यवहार करणारे ऍप्लिकेशन (Digital Transaction Application) आहे. ते थर्ड पार्टी ॲप्सच्या सहकार्याने ऑनलाइन कर्ज देखील प्रदान करते, परंतु त्याचा व्याजदर तुम्ही ज्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशनवरून कर्ज घेऊ इच्छिता त्यावर अवलंबून असतो. MoneyView, Bajaj finserv, Navi, Payme India या कंपन्यांसोबत फोनपे भागीदारीत आहे. यांच्या मदतीने तुम्ही कर्ज मिळवू शकता. यावेळी या सर्व कंपन्या त्यांचे स्वतःचे व्याजदर आकारत असतात.

व्याजदर: PhonePe Personal Loan Interest Rate

समजा तुम्ही MoneyView कडून कर्जासाठी अर्ज केला तर त्याचा व्याजदर 15% पासून सुरू होईल. त्याचप्रमाणे, इतर कंपन्यांचे व्याजदर वेगळे असतात. साधारणपणे, कंपन्या 16% ते 39% वार्षिक व्याजदराने वैयक्तिक कर्ज देतात, त्यामुळे तुम्ही त्याच दराने फोनपे वरुन वैयक्तिक कर्ज (PhonePe Personal Loan) घेऊ शकता.

पात्रता: PhonePe Personal Loan Eligibility

• अर्जदार भारतीय नागरिक असावा.

• अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल 58 वर्षे असावे.

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026

• फोनपे पर्सनल लोन मिळविण्यासाठी, अर्जदाराचा CIBIL स्कोअर 700 पेक्षा जास्त असावा.

• नोकरी करणारे किंवा बेरोजगार व्यक्ती अर्ज करू शकतात.

• अर्जदाराचे मासिक उत्पन्न किमान 25,000 रुपये असले पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

फोनपे वैयक्तिक कर्ज (PhonePe Personal Loan) मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे लागतील.

• आधार कार्ड
• बँक स्टेटमेंट
• पॅन कार्ड
• बँक खाते
• पेमेंट स्लिप
• मोबाईल नंबर
• सेल्फी इ.

अर्ज प्रक्रिया: PhonePe Personal Loan Online Apply

• सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअर वरून PhonePe App डाउनलोड करा.
• आधिपासुनच फोनपे अ‍ॅप डाउनलोड असेल तर ते ओपन करा.
• त्यानंतर बँक खात्याशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाकून अ‍ॅपमध्ये नोंदणी करा.
• नोंदणी केल्यानंतर, तुमचे बँक खाते UPI आयडीशी लिंक करा.
• एकदा खाते लिंक झाले की, अ‍ॅपच्या डॅशबोर्डमधील “Recharge & Bills” विभाग पहा आणि येथे “View All” पर्यायावर क्लिक करा.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

• यानंतर, “Financial Services & Taxes” या पर्यायावर जा आणि “Loan Repayment” या पर्यायावर क्लिक करा.

• हे केल्यानंतर, तुम्हाला सर्व थर्ड पार्टी कंपन्यांची यादी मिळेल, ज्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे ती कंपनी निवडा.

• आता त्या कंपनीचे अ‍ॅप डाउनलोड करा.
• अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, त्यात नोंदणी करा.
• यानंतर, तुम्हाला होम पेजवर पर्सनल लोनसाठी अर्ज करण्याची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
• क्लिक केल्यानंतर, काही माहिती विचारली जाईल,  तुम्हाला विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा.
• सर्व माहिती भरल्यानंतर, कर्जाचा प्रकार निवडा आणि बँकिंग माहिती भरा.
• शेवटी फॉर्म सबमिट करा.

आता वैयक्तिक कर्जासाठी (PhonePe Personal Loan) अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर तुमचा अर्ज तपासला जाईल आणि तुमचे कर्ज मंजूर केले जाईल.

➡️ Check CIBIL Score on PhonePe: फोनपे वरून मोफत सिबिल स्कोअर कसा पहावा

Leave a Comment