बाहेरून झोपडी, आतून महल, Video पाहून म्हणाल, माझं असं घर कधी होणार Social Media Viral Hut

Social Media Viral Hut – सोशल मीडियावर एका झोपडीवजा घराची सध्या तुफान चर्चा होत असल्याची पाहायला मिळत आहेत. बाहेरून अगदी सर्वसाधारण दिसणार्‍या या घराच्या आतील नजरा पाहून तुम्ही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही.

‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते’, ही म्हण आतापर्यंत कित्येक वेळा तुमच्या कानावर पडली असेल. एखादी गोष्ट जशी आपल्याला वाटते तशी नसली की आपण अशी प्रतिक्रिया देत असतो. तर सोशल मीडियावर या झोपडीवजा घराबाबतही लोक अशीच प्रतिक्रिया देत आहेत. या घराची समाज माध्यमांवर तुफान चर्चा होत आहे. या घराच्या आतील नजरा तुम्हाला आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही. याविषयीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. असं काय आहे या व्हिडिओत?

असं काय आहे या व्हिडिओत?

या Video मध्ये एक झोपडीवजा घर दिसत आहे. बाहेर दोन खुर्च्या दिसत आहे. बाहेरून हे सर्वसाधारण घर दिसत आहे. पण जसा कॅमेरा घरात जातो. तेव्हा अनेकांचे नजरा आश्चर्यचकित होतात. आतील नजाराच सर्वांना धक्का देतो. या घरात एक मोठा LED टीव्ही दिसत आहे. त्याच्या जवळच एक मोठा बेड दिसतो. शेजारीच आलिशान सोफा, टीव्ही कॅबिनेट आणि एक छोटे कूलर सुरू असल्याचे दिसत आहे.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

घरातील भिंतीवर असणारे पेटिंग आणि इतर कलाकृती तुमचे लक्ष वेधून घेतात. किचन पण स्टाईलिश असल्याचे दिसते. हे घर पूर्णपणे एअर कंडिशन्ड केलेले आहे. बाथरूममध्ये सुद्धा एसी लावलेला आहे. या घरात एक वेस्टर्न टॉयलेट आणि वॉशिंग मशीन दिसत आहे. तसेच किचनमध्ये आरओ वॉटर फिल्टर लावण्यात आलेले दिसते आहे. हे घर पाहिल्यानंतर तुम्ही आपले असे घर कधी होईल, असा जरूर विचार कराल.

व्हिडिओ पहा- येथे क्लिक करा

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @7stargrandmsti नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. 10 मार्च रोजी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत 4 लाख 60 हजाराहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओवर कमेंट्सचा महापूर आला आहे. बाहेरून झोपडी आणि आतून हा महल असल्याची कमेंट एका युझरने केलेली आहे. जर अशी झोपडी असेल तर मग महल, बंगल्याची काय गरज अशी कमेंट दुसऱ्या एका युझरने केलेली आहे.

Marginal Farmer Certificate
Marginal Farmer Certificate: तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे का? मग ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ नक्की काढा – जाणून घ्या फायदे!

Leave a Comment