SBI चा करोडो ग्राहकांना धक्का, आकर्षक व्याजदर देणारी हि खास योजना केली बंद

SBI Amrit Kalash Scheme – देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेली विशेष फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजना अमृत कलश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना 400 दिवसांच्या कालावधीसाठी सुरु करण्यात आली होती आणि गुंतवणूकदारांना यामधून आकर्षक व्याजदर मिळत होता. परंतु, 1 एप्रिल 2025 पासून ही योजना अधिकृतरित्या बंद केली आहे.

31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक केलेल्यांना काय लाभ मिळेल?

ज्या ग्राहकांनी 31 मार्च 2025 पर्यंत अमृत कलश FD योजनेमध्ये गुंतवणूक केली आहे, अशा ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यांची मूळ रक्कम आणि व्याज मॅच्युरिटीनंतर पूर्णपणे सुरक्षित असेल, त्यामुळे गुंतवणूकदारांना चिंताग्रस्त होण्याची आवश्यक्ता नाही.

अमृत कलश FD योजना काय होती?

ही एक अल्पकालीन आणि उच्च व्याजदर देणारी विशेष फिक्स्ड डिपॉझिट (FD) योजना होती, जिथे ग्राहकांना 400 दिवसांसाठी गुंतवणूक करता येत होती. SBI कडून ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती आणि ग्राहकांचा मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून वेळोवेळी ती वाढवण्यात देखील आली होती. परंतु, आता बँकेने ही योजना बंद केली असून यामध्ये नवीन गुंतवणूक स्वीकारली जाणार नाही.

अमृत कलश FD योजनेची महत्वाची वैशिष्ट्ये

कालावधी: 400 दिवस

व्याजदर:
– सामान्य ग्राहकांसाठी 7.10% आणि
– वरिष्ठ नागरिकांसाठी 7.60%

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

गुंतवणुकीची मर्यादा: ₹2 कोटींपर्यंत

कोण गुंतवणूक करू शकत होते?
– भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीय (NRI)

व्याज देण्याच्या पद्धती:
– मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा मॅच्युरिटीवर एकरकमी

अतिरिक्त सुविधा:
– या FD योजनेवर लोन घेण्याची सोय होती
– वेळेपूर्वी पैसे काढण्याची संधी उपलब्ध होती
– TDS (आयकर अधिनियमानुसार) कपात केली जात होती

गुंतवणूकदारांसाठी पुढील पर्याय कोणते?

SBI च्या इतर फिक्स्ड डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी तुम्ही विचार करू शकता. तसेच, वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना, नियमित टर्म डिपॉझिट, आणि PPF अशा पर्यायांवर देखील लक्ष ठेवता येईल.

Marginal Farmer Certificate
Marginal Farmer Certificate: तुमच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे का? मग ‘अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र’ नक्की काढा – जाणून घ्या फायदे!

Disclaimer:

वरील माहिती SBI च्या अधिकृत घोषणांवर आधारित असून, बँक नियमांमध्ये बदल करू शकते. त्यामुळे अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी तुम्ही SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा बँकेशी थेट संपर्क साधू शकता.

Leave a Comment