IPL प्रेमींसाठी Jio ची मोठी घोषणा, 90 दिवस मोफत IPL पाहण्याची संधी! बातमी पहा सविस्तर Reliance Jio IPL Offer

Reliance Jio IPL Offer : क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. जिओ कंपनीने म्हटले आहे की जिओ सिम वापरत असणाऱ्या किंवा नवीन सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त पैसे न देता 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार पाहण्याची संधी मिळणार आहे. जिओ कंपनी मोबाईल आणि टीव्ही दोन्हीसाठी मोफत हॉटस्टार सुविधा ऑफर देत आहे. तसेच कंपनी JioFiber किंवा AirFiber चे 50 दिवसांचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

कंपनीने जाहीर केले की त्यांनी Jio सिम वापरत असणाऱ्या ग्राहकांना मोबाइल आणि टीव्ही दोन्हीसाठी मोफत Hotstar पाहण्याची ऑफर दिली आहे. जे ग्राहक जुने सिम वापरत आहेत किंवा नवीन सिम खरेदी करत आहेत त्या दोन्ही ग्राहकांना ही सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. फक्त यासाठी, तुम्हाला एका ठराविक रकमेपेक्षा जास्त रिचार्ज करावा लागणार आहे. ज्यामध्ये आधीच उपलब्ध असलेल्या डेटा आणि कॉलिंग यांचीही सुविधाही असेल. (Reliance Jio IPL Offer)

किती रुपयांचा रिचार्ज करावा लागेल?

जिओने आपल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की नवीन किंवा जुन्या दोन्ही ग्राहकांना फक्त 299 रूपयांचा किंवा त्याहून अधिकचा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर त्यांना क्रिकेटच्या हंगामात हॉटस्टार विनामूल्य पाहण्याची संधी दिली जाईल. 299 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. या प्लॅनमध्ये डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सोबतच तुम्हाला OTT पाहण्याची संधी देखील मिळणार आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

काय आहे रिचार्ज प्लॅन ?

● 299 रुपयांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांसाठी मोफत Jio Hotstar मिळणार आहे, जे टीव्ही आणि मोबाइलवर तुम्ही 4K मध्ये पाहू शकता.

● 50 दिवसांसाठी मोफत JioFiber आणि AirFiber कनेक्शन देखील उपलब्ध असणार आहे. यामध्ये तुम्ही 4K मध्ये क्रिकेट पाहू शकता.

● JioFiber सोबतच, 800 प्लस टीव्ही चॅनेल, 11 प्लस OTT ॲप्स आणि अमर्यादित वायफाय सुविधा मिळेल.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

● जिओच्या या ऑफरचा लाभ ग्राहक 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान घेऊ शकतात. ऑफरचा लाभ घेण्यासाठी विद्यमान जिओ सिम वापरणाऱ्यांना किमान 299 रुपयांचा रिचार्ज करणे आवश्यक आहे.

● नवीन ग्राहकांना 299 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या प्लॅनसह नवीन जिओ सिम देखील खरेदी करणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांनी 17 मार्चपूर्वी रिचार्ज केला आहे त्यांना 100 रुपयांचा ॲड-ऑन पॅक घेऊन ऑफरचा लाभ घेता येईल. प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा उपलब्ध असेल. 90 दिवसांसाठी लागू असलेला Jio Hotstar पॅक 22 मार्चपासून सक्रिय केला जाईल.

Leave a Comment