Ladki Bahin Yojana – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या 18 लाख महिलांच्या सवलतीसाठी राज्य सरकार तिजोरीतून दरमहा 240 कोटी रुपये महामंडळा देते. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांचा सवलतीचा प्रवास बंद होणार असल्याची चर्चा होती. पण, महिलांची 50% सवलत योजना बंद केली जाणार नाही. तसा कोणताही विचार नाही असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये राज्य सरकार देते. दुसरीकडे महिलांना एसटी बसच्या तिकीट दरात 50% सवलत दिली आहे. या सवलतीमुळे राज्य सरकार दरमहा सुमारे 240 कोटी रुपये परिवहन महामंडळाला देते. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे देखील दरमहा तीन हजार 800 कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या तिकीट दराची सवलत बंद होणार, असल्याची चर्चा सुरू आहे.
सवलतीच्या योजनांचे पैसे राज्य सरकारकडून यायला विलंब होत असतो आणि त्यामुळे महामंडळासमोर देखील यावेळी अडचणी निर्माण होतात असेही त्या चर्चे मागील कारण आहे. पण, महिलांसाठी असलेली 50% तिकीट दराच्या सवलतीची योजना बंद केली जाणार नाही, अशी माहिती खुद्द परिवहन मंत्र्यांनी दिली आहे आणि त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसोबतच राज्यातील सर्वच महिलांसाठी एसटी बस प्रवासासाठी 50% सवलत योजना सुरू आहे. 50% सवलतीची योजना कायम राहील. ती बंद करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही अशी माहिती परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.