PAN and Aadhaar Card After Death – मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

PAN and Aadhaar Card After Death – बँकेच्या कामासाठी, प्रत्येक सरकारी सुविधेसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्रे आहेत. सरकारच्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तसेच बँकेच्या विविध कामासाठी प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या आधार किंवा पॅन कार्डचे काय होते याचा आपण कधी विचार केला आहे का? येथे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मृत व्यक्तीच्या आधार कार्डचे काय होते?

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची सरकारी आणि इतर अधिकृत सर्व कागदपत्रे निष्क्रिय केली जातात, असा नियम अनेक देशांमध्ये आहे मात्र भारतामध्ये तसे नाही, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे आधार कार्ड रद्द करण्यासाठी कोणतीही विशिष्ट प्रक्रिया नाही, परंतु कुटुंबातील सदस्यांची जर इच्छा असेल तर ते मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र UIDAI कडे सोपवून मृत व्यक्ती बद्दलची माहिती ते देऊ शकतात, त्या आधारावर UIDAI त्या व्यक्तीचे आधार कार्ड रद्द करून त्यांना सेवेतून काढू शकतात. यासाठी कुटुंबीयांना विचारून आणि याबद्दलची माहिती दिल्यानंतरच हे होऊ शकते

मृत व्यक्तीचे पॅनकार्ड रद्द होते काय?

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याचे पॅनकार्ड निष्क्रिय करण्याबाबत काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, त्याबद्दलची माहिती आपण येथे पाहूया. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे पॅन कार्ड आपोआप रद्द होत नाही ते सरेंडर करता येते. व्यक्तीचे अंतिम प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरेपर्यंतच पॅनकार्डचा वापर कर संबंधित उद्देशासाठी केला जात असतो, परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नॉमिनी किंवा मृत व्यक्तीचे कुटुंब त्याबाबत आयकर विभागाला कळवून मृत व्यक्तीचे पॅन कार्ड सरेंडर करू शकतात. मृत व्यक्तीचे पॅन कार्ड वापरले जाऊ शकत नाही, परंतु थकीत कर्ज किंवा आयकर विवरणासारख्या परिस्थितींमध्ये नामनिर्देशित व्यक्ती त्याचा वापर करू शकतो.

PhonePe Personal Loan Apply 2025
फोन पे देत आहे 5 लाख रूपयांचे कर्ज 10 मिनिटांत, पहा प्रोसेस PhonePe Personal Loan Apply 2025
व्हॉट्सॲप ग्रुप 👉 येथे क्लिक करा

हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गोड बातमी – महिलांसाठी दिलासा!

पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया थोडी लांबलचक आहे परंतु पॅन कार्ड सरेंडर केल्यामुळे त्या मृत व्यक्तीच्या पॅन कार्डचा कोणीही गैरवापर करू शकत नाही. पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला अधिकृत मूल्यांकन अधिकाऱ्याकडे अर्ज लिहावा लागत असतो, त्यावेळी अर्जामध्ये पॅन कार्ड का सरेंडर करायचे आहे? त्याचे मुख्य कारण तुम्हाला नमूद करावे लागत असते, पण पॅन कार्ड सरेंडर करायचे नसेल तर त्याला काही हरकत नाही कारण ते सरेंडर करणे बंधनकारक नाही, तसेच कुटुंबातील इतर व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याबाबत देखील बँकेला सूचित करणे आवश्यक असते, कारण त्यानुसार मृत व्यक्तीचे बँक खाते निष्क्रिय केले जाते.

हे देखील वाचा : शेतकऱ्यांसाठी सिंचनावर 50% अनुदान – अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती Free Pipeline Subsidy Scheme – Apply Now

Home Loan Benefits for Women
महिलेच्या नावावर घर खरेदी करण्याचे फायदे – बचत 5 ते 10 लाखांपर्यंत! Home Loan Benefits for Women

Leave a Comment