नमो शेतकरी महासन्मान योजनेचे ₹2,000 आले की नाही? या पद्धतीने मोबाईलवर स्टेटस तपासा

Namo Shetkari Yojana Status Check – राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची रक्कम ₹2,169 कोटी थेट लाभार्थ्यांच्या (DBT) बँक खात्यात जमा करण्याची घोषणा केलेली आहे.

“पीएम किसान” योजनेतून शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा लाभ

केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. प्रत्येक हप्ता 2,000 रूपयांचा असून तो लाभार्थ्यांच्या आधार आणि DBT लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.

मोबाईलवर हप्ता कसा तपासायचा

शेतकरी घरबसल्या त्यांचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे त्यांच्या मोबाईलवरुन सहज तपासू शकतात. त्यासाठी खालील पद्धत वापरा:

● सर्वप्रथम https://nsmny.mahait.org/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

PM Kisan Beneficiary List 2026
PM Kisan Beneficiary List 2026: तुमच्या गावातून कुणाकुणाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळतात, पहा नवीन लाभार्थी यादी

● त्यानंतर लाल रंगातील “Beneficiary Status” (लाभार्थी स्थिती) या पर्यायावर क्लिक करा.

● तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर टाका आणि दिलेला कॅप्चा कोड योग्य प्रकारे भरा.

● तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP (वन-टाइम पासवर्ड) येईल, तो टाका.

● “Get Data” (गेट डेटा) पर्यायावर क्लिक करा.

PM Kisan 22nd Installment Date 2026
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना मोठी खुशखबर; होळीपूर्वी खात्यात 4000 रुपये जमा होणार, पाहा मोठी अपडेट PM Kisan 22nd Installment Date 2026

● आता तुमच्या सर्व हप्त्यांची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. यामध्ये हप्ता कोणत्या तारखेला कोणत्या बँक खात्यात जमा झाला आहे, हे स्पष्ट तुम्ही पाहू शकता.

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार

राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळत असल्यामुळे त्यांना शेतीसाठी स्थिर उत्पन्नाचा आधार मिळत आहे. सरकारने योजनेचे पैसे वेळेवर जमा करण्याची व्यवस्था केली असून, कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची खात्री दिली आहे. जर तुमचा हप्ता जमा झाला नसल्यास संबंधित बँक किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.

शेतकऱ्यांसाठी डिजिटल सुविधा

ही डिजिटल प्रणाली केवळ पारदर्शक नसून भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार टाळण्याला मदत करणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हप्ता मिळण्याची खात्री सरकारने दिली आहे.

Leave a Comment