Namo Shetkari Yojana 9000 Update: नमो शेतकरी योजनेत वर्षाला आता 9,000 रुपये मिळणार? मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

Namo Shetkari Yojana 9000 Update: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘नमो शेतकरी सन्मान निधी योजने’ अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. आतापर्यंत या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळत होते. मात्र, ही रक्कम 9,000 पर्यंत वाढवण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली आहे

Namo Shetkari Yojana 9000 Update

‘नमो शेतकरी सन्मान निधी योजना’ ही केंद्र सरकारच्या PM-KISAN (प्रधानमंत्री किसान सन्मान निधी) योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात

9 हजार रुपये मिळणार पण… अंमलबजावणीत अडथळे?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की राज्यातील शेतकऱ्यांना आता 9,000 वार्षिक मदत दिली जाईल. ही वाढ म्हणजे शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा दिलासा ठरणार होता. परंतु या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी लांबणीवर पडताना दिसत आहे. यासाठी सरकारला अतिरिक्त 3,000 रुपये कोटींची तरतूद करावी लागणार आहे. मात्र, नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या निधीसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घोषणेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

जीडीएस भरती 2026
जीडीएस भरती 2026: पोस्ट ऑफिसमध्ये 10 वी पासवर 28,000+ जागा, असा करा ऑनलाइन अर्ज!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे तिजोरीवर भार?

राज्य सरकारकडून सध्या सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या योजनेच्या निधीत अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या दोन योजनांमधील प्राधान्यक्रमावरही आता अधिक चर्चा सुरु आहे

सातवा हप्ता अजूनही प्रतीक्षेत – कधी मिळणार?

सध्या राज्यातील 93 लाखांहून अधिक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खतांची खरेदी आधीच सुरू केली आहे. त्यामुळे हा हप्ता वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, निधीअभावी यामध्ये विलंब होत असल्याचे वृत्त आहे

ॲग्रीस्टॉक शेतकरी ओळखपत्र अनिवार्य होणार?

या योजनेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, भविष्यात ‘ॲग्रीस्टॉक शेतकरी ओळखपत्र’ अनिवार्य करण्यात येण्याची शक्यता. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच, राज्य सरकार देखील शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र लवकरात लवकर बनवावे, असा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे

PM Kisan Beneficiary List 2026
PM Kisan Beneficiary List 2026: तुमच्या गावातून कुणाकुणाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळतात, पहा नवीन लाभार्थी यादी

Namo Shetkari Yojana 9000 Update

सध्या तरी शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम 6,000 रुपये इतकीच आहे. 9,000 च्या घोषणेला अद्याप अर्थसंकल्पीय आधार मिळालेला नाही. मात्र, सरकारकडून लवकरच यावर निर्णय होईल आणि सातवा हप्ता वेळेत जमा होईल, अशी सकारात्मक अपेक्षा ठेवली जात आहे. शेतकऱ्यांसाठी हे आर्थिक साहाय्य खूप महत्वाचे आहे, आणि त्यासाठी शासनाने योग्य वेळी निधीची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे

➡️ घरकुल योजनेतून अनुदान किती आणि कसे मिळते? घरकुल योजनेत नवीन बदल

Leave a Comment