MPSC राज्यसेवा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध, अर्ज प्रक्रिया, अंतिम तारीख आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या MPSC Application Details

MPSC Application Details – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2025 च्या वेळापत्रकात महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येईल असे सांगितले होते. परंतु, मार्च महिना संपत आला तरीही अजुन जाहिरात आली नव्हती त्यामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. पण आता स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोगाने आनंदाची बातमी दिली आहे. आयोगाने विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2025 ही 28 सप्टेंबरला होणार असून. राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल.

आयोगाने 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची नव्या पद्धतीनुसार तयारी करत आहे. आयोगाच्या अंदाजित वेळापत्रकानुसार राज्यसेवेची जाहिरात ही जानेवारी महिन्यात येईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासुन विद्यार्थी या परीक्षेच्या जाहिरातीची आतुरतेने वाट बघत होते. परंतु, आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थी चिंतेत होते.

मागील काही महिन्यांपासून ‘MPSC’च्या अनेक परीक्षांचे निकाल, मुलाखती रखडल्या आहेत त्यामुळे उमेदवारांची नाराजी आहे. त्यातच राज्यसेवेची जाहिरातही येत नसल्याने आयोग नेमका कुठला ब्रह्ममुहूर्त शोधत आहे? असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत होता. अखेर आयोगाने 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

अर्ज प्रक्रिया काय आहे? MPSC Application Details

भरतीसाठी 28 मार्च पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होत असून पात्र उमेदवार 17 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करू शकतात. ऑनलाईन पद्धतिने 17 एप्रिल पर्यंत शुल्क भरता येईल. तसेच चालनद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल ही आहे. 17 एप्रिल ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपला अर्ज सादर करावा.

अशा आहेत विभागनिहाय जागा

MPSC आयोगाने विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून विभागनिहाय जागांमध्ये पुढील प्रमाणे जागा रिक्त आहेत.

सामान्य प्रशासन विभागराज्यसेवा127
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वनसेवा144
सार्वजनिक बांधकाम विभागस्थापत्य अभियांत्रिकी सेवा144

परीक्षा शुल्क किती ?

भरतीअंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज करतेवेळी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 544 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. तर मागारवर्गीय प्रवर्गातील उमदेवार आणि दिव्यांग तसेच अनाथ उमेदवारांसाठी 344 रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल. उमेदवारांना 17 एप्रिल 2025 पर्यंत बँक चलनद्वारे हे शुल्क भरता येईल.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

नॉन – क्रिमीलेयर प्रमाणपत्राची मर्यादा 31 मार्चला संपणार होती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अंदाजित वेळापत्रकानुसार 2025 ची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला होईल. तर या परीक्षेचा निकाल 2026 च्या जानेवारी महिन्यात लागणार आहे. राज्यातील मराठा, मराठा कुणबी, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना पदभरतीमध्ये आरक्षणाचा लाभ घेता यावा म्हणून नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र जमा करणे बंधनकारक असते. परंतु, विद्यार्थ्यांच्या नॉन – क्रिमीलेयर प्रमाणपत्राची मर्यादा 31 मार्चला संपणार होती. त्यामुळे त्यापूर्वी जाहिरात यावी अशी अपेक्षा होती.

अधिकृत वेबसाईटClick Here
नोटिफिकेशन लिंकClick Hele

Leave a Comment