Ladki Bahin Yojana Good News – राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे, अशातच योजनेतून दहा लाख महिलांना वगळले आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे, त्यामुळे ही योजना आता बंद होणार? अशी टीका विरोधी पक्षांकडून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तसेच या योजनेमधील लाभार्थ्यांची संख्या का कमी करण्यात आली? याबद्दलची माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले..
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार की काय? अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, तसेच हीच योजना नाही तर राज्यातील कोणतीही योजना बंद होणार नाही. योजनेअंतर्गत ज्या महिला पात्रतेचे निकष पूर्ण करतात त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल, परंतु नियमाच्या बाहेर जे आहेत त्यांना या योजनेमधून बाहेर ठेवावे लागणार आहे, कारण ‘कॅग’ ने त्याबाबत आपल्यावर बंधन टाकले आहे आणि त्यानुसारच योजनेचे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनाच योजनेची मदत करता येते. त्यामुळे योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांमध्ये कोणतीही कपात होणार नाही, अपात्र लोकांनाच यामधून वगळले जाईल. विरोधकांनी केलेला आरोप हा पूर्णतः चुकीचा आहे असे फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा : शेतकऱ्यांसाठी सिंचनावर 50% अनुदान – अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती Free Pipeline Subsidy Scheme – Apply Now
विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे हे 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु सध्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 1500 रुपये महिना लाभ वितरित केला जातो. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आता या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ 2100 रुपये होण्याची शक्यता आहे, अजित पवार यांनी त्याबाबतचे संकेत यापूर्वी दिले आहेत.
हे देखील वाचा : या दिवशी लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता 1500 रूपये जमा होणार; फेब्रुवारी चा हप्ता का रखडला? कारण आल समोर पहा Ladki Bahin Yojana