Ladki Bahin Yojana April Installment : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लाडकी बहिण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून झाली असून मार्च 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत नऊ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांना आतापर्यंत 13,500 रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे मार्च महिन्यात देण्यात आले आहेत.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 हजार रुपये जमा केले. दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात माहिती समोर येत आहे.
लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हफ्ता पात्र महिलांच्या खात्यात वर्ग केला आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा 8 मार्च रोजी म्हणजे महिला दिनी जमा करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसात मार्च महिन्याचे पैसे देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची.
दरम्यान एप्रिल महिन्याचा हफ्ता 6 ते 10 एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र याबाबत सरकारकडून अजून अधिकृत माहिती आलेली नाही यामुळे या तारखांनाच पुढील हप्ता जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. पण या योजनेचा हफ्ता काही महिलांना मिळणार नसल्याची बातमी देखील समोर आली आहे.
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली होती. ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत अशा महिलांकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, पण या योजनेत एकूण 50 लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून आतापर्यंत 9 लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
विद्यमान महाराष्ट्र राज्य शासनाचे खूप खूप आभार.
जे अपात्र आहेत त्यांची नावे कट करणे बरोबरच आहे जय हिंद.जय महाराष्ट्र