Ladki Bahin Yoajan Installments – लाडक्या बहिणींसाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. तसेच मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच देण्यात येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे, त्यानुसार आता फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खात्यात वर्ग होईल.
लाडकी बहीण योजना, आदिती तटकरे काय म्हणाल्या..
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता 8 मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आम्ही थेट हस्तांतरित करणार आहोत, 5 ते 6 मार्चपासून थेट डीबीटीची प्रक्रिया सुरू होईल. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळजवळ 2 कोटी 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेबद्दल विरोधकांचा सुरुवातीपासूनच आरोप आहे, गेल्या पाच – सहा महिन्यांपासून या योजनेला जो प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांमध्ये नैराश्य पसरल्याचे दिसत आहे.
हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची गोड बातमी – महिलांसाठी दिलासा!
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारीचा हप्ता, तर.. मार्च महिन्याचा हप्ता कधी?
लाडकी बहीण फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हस्तांतरित करण्यात येणार आहे, तर मार्च महिन्याचा हप्ता हा सध्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर झाल्यानंतर, अर्थ खात्याकडून काही योजनेसाठी बजेट उपलब्ध करून दिले जाईल, आणि त्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जाईल
हे देखील वाचा : शेतकऱ्यांसाठी सिंचनावर 50% अनुदान – अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती Free Pipeline Subsidy Scheme – Apply Now