HSC and SSC Result Dates – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता दहावी (Maharashtra SSC Result 2025) आणि बारावी (Maharashtra HSC Result 2025) परीक्षांचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर करेल अशी शक्यता आहे. तसेच यंदाच्या वर्षी हे निकाल जाहीर व्हायला अधिक वेळ लागणार नाही असे देखील सांगितले जात आहे. त्या उलट हे निकाल कदाचित 10 मे 2025 रोजी पर्यंत जाहीर केले जाऊ शकतात.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हे निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर परिक्षार्थीचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाकून निकाल पाहू शकतात.
इयत्ता 12वी निकाल – प्रमुख मुद्दे
– महाराष्ट्र मंडळाने 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या दरम्यान राज्यातील अनेक केंद्रांवर बारावीच्या परीक्षा घेतल्या होत्या.
– याआधी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
– ऑनलाइन निकाल सादर करतेवेळी लेखी (Theory) आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचे विषयवार गुण प्रदर्शित केले जातील.
निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
– अधिकृत वेबसाइटला भेट द्या – mahresult.nic.in
– त्यानंतर ‘HSC Examination Result 2025’ या लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर तुमचा बारावीचा सीट नंबर आणि आईचे पहिले नाव एंटर करा.
– तुमचे गुण पाहण्यासाठी ‘GET RESULT’ या पर्यायावर क्लिक करा.
– भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड किंवा प्रिंट करा.
महाराष्ट्र इयत्ता 10वी, 12वी परीक्षा श्रेणी पद्धती
महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टक्केवारी-आधारित श्रेणी पद्धतीचे अनुसरण करते. या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत.
गुणांची श्रेणी
– प्रथम श्रेणी 60% आणि त्याहून अधिक
– द्वितीय श्रेणी 45% ते 59%
– उत्तीर्ण 35% ते 44%
– 35% पेक्षा कमी अनुत्तीर्ण
12वी प्रमाणेच आपण mahresult.nic.in वर जाऊन इयत्ता दहावीचे निकाल (निकाल जाहीर झाल्यानंतर) पाहू शकता. या वेबसाईटवर जाऊन ‘SSC Examination Result 2025’ या पर्यायावर क्लिक करा आणि इतर प्रक्रिया जशीच्या तशी वापरा. तुम्हाला गुणपत्र स्क्रीनवर पाहायला मिळेल.
