How to apply for PM Mudra Loan online: भारतातील लघु उद्योग, लहान व्यावसायिक आणि नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना (PM Mudra Loan) सुरू करण्यात आली. यामार्फत कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीशिवाय आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते.
Types of PM Mudra Loan (व्यवसायाच्या गरजेनुसार योग्य प्रकार निवडा)
PM Mudra Loan तीन मुख्य प्रकारांत विभागले गेले आहेत:
1. Shishu Loan (शिशु लोन):
• 50,000 पर्यंतचे कर्ज
• नव्याने व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी
• किमान कागदपत्रे आणि प्रक्रिया
2. Kishor Loan (किशोर लोन):
• 50,001 ते 5 लाखांपर्यंत कर्ज
• व्यवसाय वाढवण्यासाठी
3. Tarun Loan (तरुण लोन):
• 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज
• पूर्णपणे स्थिर व्यवसाय वाढवण्यासाठी
लोन मिळवण्यासाठी पात्रता Eligibility for PM Mudra Loan Yojana
लोन (PM Mudra Loan) घेण्यासाठी खालील पात्रता आवश्यक आहे:
➤ अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 65 वर्षे असावे.
➤ अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
➤ व्यवसायाचा प्रकार:
(खालील प्रकारचे व्यवसाय करणारे अर्ज करू शकतात:)
• लघुउद्योग (Small/ Micro Enterprises)
• स्टार्टअप/नवउद्योजक
• रिक्षा चालक, फूड स्टॉल चालक, टेलर, सायबर कॅफे, किराणा दुकानदार
• शेती पूरक व्यवसाय (डेअरी, पोल्ट्री, फिशरी)
• सेवा क्षेत्रातील व्यवसाय
• उत्पादन व व्यापार करणारे सूक्ष्म व्यावसायिक
➤ अर्जदाराकडे व्यवसाय सुरू असावा किंवा तो सुरू करण्याची स्पष्ट योजना (Business plan) असावी.
➤ कर्जाची रक्कम 10 लाखांपर्यंत असते (शिशु, किशोर, तरुण श्रेणीनुसार).
➤ चांगला CIBIL स्कोअर असल्यास कर्ज मंजुरी लवकर होते, जरी PM Mudra Loan साठी अनिवार्य नसला तरी.
➤ मुद्रा योजनेत गॅरंटी (Collateral) लागत नाही (कोणत्याही हमीदाराची आवश्यकता नाही:)
➤ अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे Documents required for Mudra Loan
• आधार कार्ड, PAN कार्ड
• व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र (असल्यास)
• बँक खाते तपशील
• फोटो
• प्रकल्प अहवाल / व्यवसाय योजना
• GST नोंदणी (काही प्रकरणात)
अर्ज प्रक्रिया How to apply for PM Mudra Loan online
ऑनलाइन अर्ज (Online Process)
• https://www.udyamimitra.in/ या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येतो.
• Udyam Aadhaar नंबर आवश्यक आहे.
• आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा.
बँकेतून अर्ज (Mudra Loan Bank process)
• जवळच्या बँकेत किंवा वित्तसंस्थेत संपर्क करा.
• अर्ज सादर करा, कागदपत्रे द्या.
• बँक तुमच्या व्यवसायाची पडताळणी करून लोन मंजूर करते.
Benefits of PM Mudra Loan
• कोणतीही गॅरंटी लागत नाही
• सबसिडी आणि व्याजदर सवलती
• व्यवसाय सुरूवातीस मदत
• महिला उद्योजकांना विशेष प्राधान्य
• ऑनलाइन अर्जाची सुविधा
Mudra Loan Application: महत्त्वाच्या टिप्स
• Business Plan: चांगला व्यवसाय आराखडा तयार ठेवा.
• CIBIL Score: चांगला CIBIL स्कोअर ठेवा.
• Follow Up: बँकेमध्ये अर्ज दिल्यावर वेळोवेळी फॉलोअप घ्या.
• Correct Documents: सर्व कागदपत्रे अचूक आणि अद्ययावत ठेवा.
PM Mudra Loan 2025 Update
• डिजिटल प्रक्रिया अधिक सुलभ
• महिला, अनुसूचित जाती/जमातींसाठी प्राधान्य
• UPI आणि MSME लिंक्ड फायदे
• नवीन उद्योगांसाठी प्रशिक्षण सुविधा
मुद्रा लोन मंजुरीस लागणारा कालावधी:
सामान्यतः, PM Mudra Loan मंजूर होण्यासाठी लागणारा वेळ 7 ते 15 कार्यदिवसांपर्यंत असतो, जर सर्व कागदपत्रे योग्यरीत्या सादर केली गेली असतील आणि अर्ज पूर्ण असेल.
महत्त्वाचं:
मुद्रा लोनसाठी अर्ज सरकारी पोर्टलवरून किंवा जवळच्या बँकेत विनामूल्य करता येतो. यासाठी कोणत्याही प्रोसेसिंग फी किंवा एजंटची आवश्यक्ता नाही.
पंतप्रधान मुद्रा योजना (PM Mudra Loan) ही योजना लघुउद्योगांसाठी एक सुवर्णसंधी आहे. कोणतीही गॅरंटी न देता व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. यामधून आपण आपला व्यवसाय सुरू करू शकता किंवा विद्यमान व्यवसाय वाढवू शकता. योग्य माहिती, कागदपत्रे आणि व्यवसाय योजना असल्यास, आपल्यासाठी मुद्रा योजना अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
➡️ Personal Loan Benefits: पर्सनल लोन घेण्याचे 10 जबरदस्त फायदे, इतर कर्जांपेक्षा उत्तम पर्याय