महिलेच्या नावावर घर खरेदी करण्याचे फायदे – बचत 5 ते 10 लाखांपर्यंत! Home Loan Benefits for Women

Home Loan Benefits for Women – आपल्या हक्काचं घर असावं असे गावातून शहरात आलेल्या प्रत्येकाला वाटत असतं, पण घराच्या किमती आवाक्या बाहेरच्या आहेत. नवीन घर खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल, तर ही बातमी तुम्हाला खूप मदत करेल. तुम्ही जर विवाहित असाल तर पत्नीच्या नावे घर खरेदी करून तुम्हाला चांगला लाभ मिळवता येईल. महिलांचा समाजामध्ये सहभाग वाढावा यासाठी केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे, यामुळे पुरुषांच्या तुलनेत अनेक गोष्टींमध्ये महिलांना देखील सवलत मिळत आहे.

मालमत्ता खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक नियम केले आहेत. आता महिलांना मालमत्ता खरेदी करणे अधिक सुलभ झाले आहे, कारण मालमत्ता करात त्यांना विशेष सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्वतःसाठी घर घ्यायचे असेल, तुम्ही जर तसा विचार करत असाल, तर तुम्ही ते पत्नीच्या नावावरती खरेदी करा, ज्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पत्नीच्या नावे घर खरेदी केल्यास तुम्हाला कोणकोणते लाभ मिळतील याची माहिती आपण येथे पाहू. (Home Loan Benefits for Women)

व्याजदरात सवलत

मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्ही गृहकर्ज काढत असाल तर ते पत्नीच्या नावावरच काढून घर खरेदी करणे अधिक चांगले, कारण भारतामध्ये अशा अनेक बँका आणि गृहनिर्माण कंपन्या आहेत ज्या महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी व्याज दरात कर्ज देतात. पत्नीच्या नावावरती गृह कर्ज काढून तुम्हाला या सवलतीचा लाभ घेता येईल

How to Check Ration Card eKYC Status Online
ration card ekyc status check online: तुमची रेशन कार्ड ई-केवायसी पूर्ण झाली आहे किंवा नाही? असे मोबाईलवरुन पहा 2 मिनिटांत

मुद्रांक शुल्कात सूट

ज्यावेळी तुम्ही नवीन घर खरेदी करत असता तेव्हा तुम्हाला खरेदीखत तयार करणे आवश्यक असते. अनेक कागदपत्रांची जुळवाजुळवा हे तयार करताना तुम्हाला करावी लागते. तसेच घराची नोंदणी देखील करावी लागते. यासाठी तुम्ही मुद्रांक शुल्क भरत असता, आणि घराच्या किमतीनुसार तुम्हाला अधिक स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असते. पण भारतातील अनेक राज्यांत महिलांना पुरुषांच्या तुलनेत मुद्रांक शुल्कात सूट मिळते. त्यामुळे पत्नीच्या नावे घर खरेदी करून तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता

हे देखील वाचा : PAN and Aadhaar Card After Death – मृत्यूनंतर आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

मालमत्ता कर सूट

महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी करताना मालमत्ता संबंधित करातही तुम्हाला सूट मिळत असते. काही महापालिकेने ही सूट दिल्याचे आपल्याला पाहायला मिळते. जर मालमत्ता महिलेच्या नावावर असेल तर तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता.

remove minimum balance charges from saving accounts
remove minimum balance charges from saving accounts: आता खात्यात पैसे नसले तरी चिंता नको! – SBI सह या 6 बँकांनी समाप्त केला मिनिमम बॅलन्स चार्ज

पत्नीची आर्थिक सुरक्षा आणि स्वावलंबन

महिलेच्या नावावर मालमत्ता असेल तर त्यावेळी तिची आर्थिक सुरक्षा मजबूत होऊन ती स्वावलंबी बनत असते. त्यामुळे पूर्ण स्वातंत्र्याने तिला कोणताही निर्णय घेता येतो. मालमत्ता खरेदीसाठी आज सहज कर्ज उपलब्ध होते त्यासाठी अनेक गृहनिर्माण वित्तीय कंपन्या महिलांना कमी व्याज दरात कर्ज देत आहेत, तसेच मुद्रांक शुल्कात मिळणारी सूट याशिवाय टॅक्समध्येही मिळणारी सूट या सर्व लाभांमुळे परिणामी गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी अधिक प्रमाणात होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे.

Leave a Comment