आता ‘Google Pay’ वरून करा क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट – जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि फायदे!

Google Pay Credit Card Payment: भारतातील डिजिटल व्यवहारांच्या दुनियेत खुप मोठा बदल! आता RuPay क्रेडिट कार्ड वापरून Google Pay वरून थेट UPI पेमेंट करता येणार आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ डेबिट कार्डपुरती मर्यादित होती, पण आता क्रेडिट कार्डद्वारेही जलद, सुरक्षित आणि सहज व्यवहार शक्य होतील.

क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंटची सुविधा सुरु

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार Google Pay ने Credit Card UPI Payment सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमुळे वापरकर्त्यांना आता छोट्या दुकानांपासून मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मपर्यंत, कुठेही क्रेडिट कार्डद्वारे UPI व्यवहार करता येऊ येतील – तेही कार्डशिवाय

UPI व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ

मार्च 2025 मध्ये 24.77 लाख कोटी रुपयांपर्यंत UPI व्यवहार झाले असून – फेब्रुवारीच्या तुलनेत हा आकडा 12.7% नी अधिक आहे. हे भारतातील डिजिटल व्यवहारांवरील लोकांचा वाढता विश्वास दर्शवते.

कोणत्या बँकांचे कार्ड वापरता येणार?

RuPay क्रेडिट कार्ड्स देशातील अनेक मोठ्या बँकांकडून दिले जातात:

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment: PM किसान 2000 हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार – कृषी मंत्रालयाने केले जाहीर

• स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
• एचडीएफसी बँक
• आयसीआयसीआय बँक
• पंजाब नॅशनल बँक
• अ‍ॅक्सिस बँक
• तसेच अनेक प्रादेशिक आणि सहकारी बँका

Google Pay मध्ये RuPay क्रेडिट कार्ड कसे जोडा?

पायरी 1: Google Pay अ‍ॅप उघडा
पायरी 2: प्रोफाइल फोटोवर क्लिक करून ‘Payment methods’ मध्ये जा
पायरी 3: ‘Add RuPay Credit Card’ निवडा
पायरी 4: कार्ड डिटेल्स भरून OTP टाका
पायरी 5: UPI PIN सेट करा

एकदा कार्ड लिंक केल्यावर, तुम्ही कुठेही QR कोड स्कॅन करून किंवा UPI आयडीने पेमेंट करू शकता.

कोणते मिळणार फायदे?

• झटपट आणि सुरक्षित व्यवहार
• बँकेकडून कॅशबॅक व रिवॉर्ड्स
• क्रेडिट कार्डशिवाय व्यवहार
• स्थानिक दुकानांपासून Amazon, Flipkart सारख्या ऑनलाईन स्टोअर्सपर्यंत सुविधा

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

काही गोष्टी लक्षात ठेवा

Google Pay क्रेडिट कार्डद्वारे पेमेंटसाठी 2025 पासून 0.5% ते 1% पर्यंतचे चार्जेस आकारते. हे शुल्क व्यवहाराच्या प्रकारावर अवलंबून आहे. मात्र, बँक खात्यावरून UPI व्यवहार हे अजूनही मोफत आहेत.

डिजिटल इंडिया साकार करण्याचं पाऊल

Google Pay आणि RuPay क्रेडिट कार्ड यांची पार्टनरशिप भारतात डिजिटल एकीकरण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मोठी बाब आहे. यामुळे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित होतील.

Leave a Comment