Gay Gotha Anudan Yojana : शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाय म्हैस पालनासाठी राज्य सरकारने विशेष अनुदान योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक आणि पक्के गोठे बांधण्यास मदत होणार आहे.
3 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना गाय म्हैस पाळण्यासाठी पक्के गोटे बांधायला या योजनेअंतर्गत मदत केली जाते. शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पशुपालन करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. ग्रामीण भागात पशुपालन व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी ही योजना राबवली जात आहे. पशुपालकांसोबत शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे पशुपालनासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर असल्याचे पहायला मिळते.
योजनेचे फायदे Gay Gotha Anudan Yojana Benefits
● आधुनिक पद्धतीच्या गोठा बांधणीमुळे पशुधनाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
● दूध उत्पादनात वाढ होते.
● पशुधनाची निगा राखण्यास मदत होते.
● गोठा बांधणीसाठी मोठी रक्कम स्वतःला खर्च करावी लागत नाही.
● या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होते.
अर्ज प्रक्रिया Gay Gotha Anudan Yojana Application process
● शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल. कारण सध्या या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध नाही.
● ऑफलाईन अर्जासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करावा लागेल.
● तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येतो.
Gay Gotha Anudan योजना काय आहे?
शेतकऱ्यांना, पशुपालकांना जनावरांचे संगोपन योग्यरित्या करता येण्यासाठी आणि त्यांचे चांगल्या प्रकारे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार मार्फत ही योजना राबवली जात आहे
आवश्यक कागदपत्रे Gay Gotha Anudan Yojana Required documents
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत
● सातबारा उतारा
● आधार कार्ड
● बँक पासबुक
● पशुधन असल्याचा पुरावा
● जागेची मालकी हक्काची कागदपत्रे
योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
2 ते 6 जनावरांचा गोठा असल्यास
● 2 ते 6 जनावरांचा गोठा बांधण्यासाठी शासनाकडून एकूण 77 हजार 188 रुपये इतके अनुदान या योजनेमधून दिले जाते.
6 ते 12 जनावरांचा गोठा असल्यास
● 6 ते 12 जनावरांचा गोठा बांधण्यासाठी शासनाकडून एकूण 1 लाख 54 हजार 376 रुपये इतके अनुदान या योजनेमधून दिले जाते.
13 पेक्षा अधिक जनावरांचा गोठा असल्यास
● 13 पेक्षा अधिक जनावरांचा गोठा बांधण्यासाठी शासनाकडून 2 लाख 31 हजार 564 रुपये इतके अनुदान या योजनेमधून दिले जाते.
या योजनेसाठी पात्र कोण आहेत Gay Gotha Anudan Yojana Eligibility
● अर्जदार शेतकरी असावा.
● त्याच्याकडे स्वतःची जागा असावी.
● पशुधन पाहता येण्याचा त्याला अनुभव असावा.
● ग्रामीण भागातील पशुपालकांना, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
