Desi Jugaad Air Cooler: एक भारतीय तरुणाने टेबल फॅन, बाटली, पाईप आणि बर्फ वापरून घरच्या घरी अवघ्या ₹50 मध्ये बनवला ‘एसी’! पाहा व्हायरल व्हिडिओ आणि करा गरमीवर मात.
गरमीपासून वाचण्याचा भन्नाट देसी जुगाड!
भारतासारख्या उष्ण हवामान असलेल्या देशात उन्हाळ्यात AC किंवा कूलर असणे महत्त्वाचे वाटते. पण सगळ्यांकडे त्यासाठी बजेट असतेच असे नाही. अशा वेळी भारतीय नागरिकांचा ‘जुगाडू’ स्वभावच कामी येतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक तरुणाने अवघ्या ₹50 मध्ये घरगुती एसी तयार केला आहे.
फक्त चार वस्तू – आणि तयार झाला ‘Desi AC’!
या व्हिडीओमध्ये तरुणाने टेबल फॅन, प्लास्टिक बाटली, पाईप आणि थोडासा बर्फ वापरून AC सारखी थंड हवा देणारा कूलर बनवला आहे. नक्कीच, हा जुगाड इंजिनियरिंगचा एक अफलातून नमुना म्हणावा लागेल.
नेटिझन्स म्हणतात – “हे फक्त भारतीयच करू शकतात!”
व्हिडीओ इंस्टाग्रामवर @muthuranji या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी कमेंट करत कौतुक केलंय. कुणी म्हणालं – “वाह, एक नंबर जुगाड!”, तर कुणी लिहिलं – “हे फक्त भारतीय लोकच करू शकतात.”
तुम्हालाही करायचाय घरगुती AC तयार?
जर तुमच्याकडे टेबल फॅन आणि थोडं डोकं असेल, तर तुम्हीही हा जुगाड घरी करू शकता. फक्त ₹50 मध्ये गरमीवर मात करा आणि मिळवा AC सारखी थंड हवा – तेही विजेच्या बिलाची चिंता न करता!
पाहा व्हिडीओ आणि ट्राय करा हा भन्नाट जुगाड!