CIBIL Score improve trick – पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड हवे असल्यास, चांगला क्रेडिट स्कोअर किंवा CIBIL स्कोअर असणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर 3 डिजिट क्रमांकाचा असून तो प्रामुख्याने तुमची क्रेडिट पात्रता, परतफेडीची निष्ठा आणि मागील क्रेडिट हिस्ट्री दाखवतो. भारतामध्ये तो सर्वसाधारणपणे 300 ते 900 च्या दरम्यान असतो.
800 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर राखल्यास तुमचे प्रोफाइल ‘एक्स्ट्रा ऑर्डिनरी’ लोकांच्या लेव्हलवर जाऊ शकते. या स्कोअरमुळे तुम्हाला कर्जावरील सर्वोत्तम व्याजदर, प्रीमियम क्रेडिट कार्डची ऑफर आणि सोप्या कर्जाच्या अटी मिळवता येऊ शकतात. तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी आणि तो 800 पेक्षा जास्त करण्यासाठी आम्ही येथे काही मार्ग दिले आहेत ते तुम्हाला नक्कीच मदत करतील.
वेळेवर बिले आणि EMI भरा – क्रेडिट कार्ड बिल, कर्जाचे EMI किंवा इतर कर्ज नेहमी योग्य वेळेत भरा. उशिरा पेमेंट केल्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होत असतो. कोणतेही कर्ज वेळेत भरता यावे म्हणून ऑटोमेटिक पेमेंट पर्याय सेट करा. एक देखील पेमेंट चुकले तरी तुमचा स्कोअर खराब होऊ शकतो आणि तो 800 च्या खाली येऊ शकतो.
क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) कमी ठेवा – तुमच्या क्रेडिट लिमिटचा 30 टक्क्यांपेक्षा जास्त वापर करू नका. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट लिमिट 1 लाख रुपये असेल, तर तुम्ही 30,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च करू नका.
दीर्घ क्रेडिट हिस्ट्री ठेवा – ज्यांचा पेमेंट रेकॉर्ड चांगला आहे अशी जुनी क्रेडिट अकाउंट्स बंद करू नका. दीर्घ आणि चांगली क्रेडिट हिस्ट्री तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यास मदत करेल.
तुमच्या क्रेडिट मिक्सकडे लक्ष द्या – सुरक्षित (गृहकर्जांसारखे) आणि असुरक्षित (वैयक्तिक कर्जांसारखे) क्रेडिटमध्ये योग्य संतुलन ठेवा. यामुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कर्जे जबाबदारीने हाताळू शकता असे दिसून येते.
तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासा – तुमचा क्रेडिट रिपोर्ट नेहमी तपासत रहा. त्यामध्ये कोणत्याही चुका नसल्याची खात्री करा (जसे की चुकीच्या कर्ज नोंदी) जर काही चूक असेल तर ती लगेच दुरुस्त करा.
ऑथराइज्ड यूजर बना – तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची क्रेडिट हिस्ट्री दीर्घ आणि पॉझिटिव्ह असेल, तर तुम्ही त्यांना तुमच्या कार्डचा अधिकृत यूझर बनवू शकता. यामुळे, तुम्हाला त्यांच्या चांगल्या हिस्ट्रीचा लगेच फायदा मिळू शकतो.
तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर 800 किंवा त्यापेक्षा जास्त हवा असेल तर ते शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.