लाल, काळा? उन्हाळ्यात पाणी थंड ठेवण्यासाठी कोणत्या रंगाचा माठ सर्वोत्तम

Black Or Red Pot, Which Is Better In Summer : उन्हाळ्यात सर्वांना थंडगार पाणी हवं असतं. फ्रिज पेक्षा पारंपारिक मातीच्या माठातील पाणी प्यायला सर्वच पसंत करतात. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की अनेक जण थंडगार पाणी प्यायला बाजारामधून मातीचे माठ खरेदी करतात. बाजारामध्ये हे माठ तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. लाल, काळया अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये हे पाहायला मिळतात. यावेळी कोणत्या मातीचा माठ घ्यावा? असा प्रश्न अनेकांना उपस्थित होतो.

बाजारामध्ये तीन प्रकारचे माठ उपलब्ध आहेत

सध्या उन्हाळा वाढत असून बाजारामध्ये माठांची दुकाने सजली आहेत. विविध आकारांचे आणि विविध रंगांचे माठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. लाल, काळया, पांढऱ्या मातीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी कोणता माठ घ्यावा याबद्दल संभ्रम निर्माण होतो. आहार तज्ञांच्या सांगण्यानुसार मातीचा कोणताही माठ वापरणे फायदेशीर आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

कोणता माठ घ्यावा?

काळा रंग हा उष्णता शोषून घेणारा आहे. या कारणामुळे काळ्या माठामधील पाणी हे लवकर थंड होत असतं. शरीरासाठी ते फायदेमंद आहे. यामुळे काळ्या माठाला मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते. लाल आणि पांढऱ्या माठा मधील पाणी हे देखील आरोग्यासाठी चांगले असते. बजारामध्ये माठ घेताना ते काळजीपूर्वक तपासून घेणे आवश्यक आहे. कारण हे माठ बनवतेवेळी त्यामध्ये सिमेंटचा वापर केलेला असतो त्यामुळे कोणताही रंगाचा माठ घेतेवेळी तो काळजीपूर्वक तपासूनच घ्यावा.

मातीचा माठ ओळखायचा कसा?

मातीच्या माठामध्ये सिमेंट मिसळल्याचे प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे योग्य खात्री करूनच माठ खरेदी करा. माठ खरेदी करतेवेळी त्याचं वजन तपासा. पाहायला गेले तर मातीचे माठ हे वजनाने खूप हलके असतात. परंतु सिमेंट मिश्रित माठ हे वजनाने जड असल्याचे पाहायला मिळतात. मातीच्या माठामधील पाणी सिमेंट माठाच्या पाण्यापेक्षा चांगले असते. त्यामुळे उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी मातीचा माठ निवडताना काळजी घ्यावी.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

बाजारांमधील उपलब्ध असणारा काळा, लाल किंवा पांढरा कोणत्याही रंगाच्या माठा मधील पाणी पिण्यासाठी चांगले असते. काळ्या माठांमधील पाणी हे लवकर आणि अधिक थंड होत असते, तर लाल आणि पांढऱ्या मातीच्या माठातील पाणी हे सावकाश आणि कमी थंड होत असते.

Leave a Comment