Bhaubij bhet 2000 GR: राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने प्रत्येकी दोन हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटद्वारे दिली.
Bhaubij bhet 2000 GR
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांच्या आरोग्यासाठी आणि लहान मुलांच्या पोषणासाठी मनापासून दिवसरात्र काम करत असतात. त्यांच्या या कष्टांचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने दिवाळीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाऊबीजेच्या स्वरूपात आर्थिक मदत जाहीर केली आहे.
प्रत्येक सेविकेला मिळणार दोन हजार रुपयांची भेट
यात प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीस हातभार लागण्यास मदत मिळेल. तसेच, या योजनेसाठी एकूण 40 कोटी 61 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा दिवाळी सण अधिक आनंदात साजरा होईल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला.
अंगणवाडी सेविका समाजाची खरी ताकद
तसेच, प्रत्येक अंगणवाडी सेविका ही समाजाची खरी ताकद आहे. त्यांचा दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा, यासाठीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. ही भाऊबीजेची भेट रक्कम लवकरच सेविकांना दिली जाईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

➡️ लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर चे 1500 रुपये ‘या’ तारखेला मिळणार; नवीन यादी पहा