गॅस सबसिडी जमा झाली; पहिला टप्पा वितरण पूर्ण, मोफत 3 गॅस सिलिंडर अनुदान जमा Annapurna Yojana Gas Subsidy

Annapurna Yojana Gas Subsidy: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतानाच, आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या गॅस सबसिडीचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेद्वारे वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, त्यातील पहिल्या हप्त्याचे वितरण आता प्रत्यक्ष रित्या सुरू झाले आहे.

​25 डिसेंबरपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर 569 रुपये जमा झाल्याचे संदेश प्राप्त होत आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा केली जात आहे. 31 डिसेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

कोणाला मिळणार या योजनेचा लाभ

​मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. ही योजना प्रामुख्याने दोन गटांतील महिलांसाठी लागू करण्यात आली होती. यामध्ये केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांचा समावेश आहे.

10th Result Date 2026 Maharashtra Board
यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

​सध्या सुरू झालेले 569 रुपयांचे वितरण हे प्रामुख्याने उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आहे. या महिलांना केंद्र सरकारकडून मिळणारी सबसिडी वेगळी आणि राज्य सरकारकडून मिळणारी ही अतिरिक्त सबसिडी अशा स्वरूपात लाभ मिळत आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर स्वतःचे गॅस कनेक्शन आहे, त्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.

गॅस कनेक्शन आणि पात्रतेच्या अटी

​या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही तांत्रिक अटी पूर्ण असणे आवश्यक आहे. गॅस कनेक्शन हे संबंधित महिलेच्या स्वतःच्या नावावर असणे अनिवार्य आहे. मग ते कनेक्शन एचपी, इंडियन किंवा भारत गॅस यापैकी कोणत्याही कंपनीचे असले तरी चालते. जर गॅस कनेक्शन कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावर असेल, तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

​अनेक महिलांना अद्याप सबसिडीचा मेसेज आलेला नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. राज्य सरकारने यापूर्वीच 50 कोटी रुपयांच्या निधी वितरणाचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला होता. त्यामुळे येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने सर्व पात्र महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.

Measure Land Online
मोबाईलवरून जमीन मोजणी 2026: आता तुमच्या खिशात असेल ‘डिजिटल मोजणीदार’! Measure Land Online

बँक खाते आणि आधार लिंकिंग तपासा

​ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, त्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे हे पैसे जमा होत असल्याने आधार लिंकिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळाला आहे का, हे तुमच्या बँक पासबुकवर एन्ट्री करून किंवा मोबाईल बँकिंगद्वारे तपासावे.

➡️ नमो शेतकरी 8 वा हप्ता या दिवशी येणार? पण लाभार्थी संख्येत मोठी घट; पहा नवीन नियम!

Leave a Comment