आधार कार्डवरील नाव, पत्ता बदलायचाय? आता ही कागदपत्रे लागणार; पहा नवीन नियम Aadhaar Update New Rules

Aadhaar Update New Rules: ‘UIDAI’ ने आधारकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता आधार कार्ड अपडेट करणे खूप सोपे झाले आहे. तुम्हाला जर आधार कार्डवरील कोणतीही माहिती बदलायची असेल तर त्याची प्रोसेस सोपी केली आहे. पत्त्याचा पुरावा, जन्मतारीख आणि रिलेशनशिप पुराव्यासाठी वैध कागदपत्रे स्पष्ट केली आहेत ती पुढील प्रमाणे;

आधार कार्डवरील नाव बदलणे (Aadhaar Card Name Change)

‘UIDAI’ च्या नवीन अपडेटनुसार आधार कार्डवरील नाव बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये पासपोर्ट किंवा पॅन कार्ड स्विकारले जाईल. यावर तुमची सर्व माहिती असते. तसेच वोटर आयडीवर तुमचा फोटो आणि नाव असते त्यामुळे आधार अपडेटसाठीही हे ग्राह्य धरले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र, मॅरेज सर्टिफिकेटदेखील स्विकारले जातील.

पत्ता बदलण्यासाठी कागदपत्रे (Aadhaar card Address Proof Change)

आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट, बँकेचे पासबुक किंवा बँक स्टेटमेंट स्विकारले जाईल. वीजेचे बिल, पाण्याचे बिल आणि गॅस बिलदेखील ग्राह्य धरले जाईल. मात्र, हे बिल जास्त जुने नसायला हवे. भाडेकरूंना अग्रीमेंटसोबत पोलिस व्हेरिफिकेशन किंवा नोटरी आवश्यक आहे.

जन्मतारीख बदलण्यासाठी कागदपत्रे

आता जन्मतारीख अपडेट करायची असेल तर जन्म प्रमाणपत्र, 10वी-12वीचे मार्कशीट, पॅन कार्ड ही कागदपत्रे ग्राह्य धरली जातील.

PM Kisan Beneficiary List 2026
PM Kisan Beneficiary List 2026: तुमच्या गावातून कुणाकुणाला पीएम किसानचे 2000 रुपये मिळतात, पहा नवीन लाभार्थी यादी

आधार अपडेट कसे करायचे? (Aadhaar Update Process)

• सर्वात आधी तुम्हाला ‘Aadhaar Enrollment/Update Center’ किंवा ‘myAadhaar’ या ॲपवर जा.

• यानंतर तुम्हाला जी माहिती बदलायची आहे तो ऑप्शन निवडा

• आवश्यक कागदपत्र अपलोड करा.

• यानंतर विचारलेली तुमची योग्य माहिती भरा

PM Kisan 22nd Installment Date 2026
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना मोठी खुशखबर; होळीपूर्वी खात्यात 4000 रुपये जमा होणार, पाहा मोठी अपडेट PM Kisan 22nd Installment Date 2026

• आधार अपडेट झाल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या पत्त्यावर ते पाठवले जाईल.

➡️ मोफत 3 गॅस अनुदान होणार जमा; नेमके कीती?

Leave a Comment