Aadhaar Seeding – शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ घेता यावा, या उद्देशाने थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी बँक खाते आधार कार्डाशी लिंक (Aadhaar Seeding) असणे अनिवार्य आहे.
देशातील निराधार लाभार्थ्यांसाठी सरकार योजना राबवत आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट लाभ मिळावा यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांचा बँक तपशील व आधार केवायसी करण्यासाठी सरकार कडून मोहीम सुरू करण्यात आली आहे; परंतु जालना जिल्ह्यात योजनेचे एकूण 1 लाख 30 हजार 205 इतके लाभार्थी आहेत.
योजनेतील पात्र 27 हजार 312 लाभार्थ्यांनी अजुनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामुळे या लाभार्थ्यांना सरकारचे अनुदान नको असल्याचे दिसून येत आहे. योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे (DBT) अर्थसाहाय्याचे वितरण करण्यात येत आहे. नियमित अनुदान मिळविण्यासाठी निराधारांचे आधार अपडेट व बँक खाते आधार लिंक असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे अर्थसाहाय्याचे वितरण करण्यात येत आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार लिंक करण्याचे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे.
‘आधार’ लिंक नाही
जिल्ह्यात निराधार योजनेचे पात्र 1 लाख 30 हजार 205 लाभार्थी आहेत, परंतु यापैकी 27 हजार 312 इतक्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे दिसून येत आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी 67 हजार 174 लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. म्हणजेच, जिल्ह्यातील निराधार योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 88% लाभार्थ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
लाभार्थ्यांना आवाहन
● निराधार योजनेचे अनुदान आता ‘डीबीटी’ मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिले जात आहे.
● योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे नक्की करा
● वेबसाईट ओपन करा https://myaadhaar.uidai.gov.in
● Login वर क्लिक करा
● त्यानंतर आपला आधार क्रमांक टाका.
● कॅप्चा कोड प्रविष्ट करून पुढे जा.
● आपल्याला OTP येईल तो टाका व पुढे जा (सदर OTP हा ज्या मोबाईल नंबरला आपले आधार लिंक असेल त्याच मोबाईलवर येईल.)
● आपल्या आधारचे पेज ओपन होईल त्यामध्ये Bank Seeding Status हा पर्याय निवडा.
● आपले आधार कोणत्या बँकेत कोणत्या खात्याला जोडले आहे त्याची माहिती व स्टेटस आपल्याला समजेल.
● आपल्या आधारवरील पत्ता जर चुकीचा असेल तर तोही 14 सप्टेंबर, 2024 पर्यंत आपण स्वतः विनाखर्च अपडेट्स करू शकता.
● आधार सीडिंगमुळे आर्थिक व्यवहार सुलभ होतात, कागदपत्रे कमी होतात आणि सुरक्षितता वाढते.
● DBT आणि त्रासमुक्त बँकिंगचा लाभ मिळवण्यासाठी तुमचे आधार तुमच्या बँक खात्याशी जोडले असल्याची खात्री करा.
● Direct Benefit Transfer (DBT) ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एक अशी प्रणाली आहे, ज्याद्वारे सरकारी योजनांद्वारे मिळालेल्या पैशाचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतो.