Viral Video: चांगल्या कर्माचं, चांगलं फळ! नेमकं काय घडलं व्हिडीओमध्ये? पाहा व्हायरल व्हिडीओ

जसे करावे तसे भरावे’, ही म्हण किती खरी आहे याचं उत्तम उदाहरण सध्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. इंटरनेटवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक युवक केवळ गटाराचं उघडं झाकण लावण्यासाठी थांबतो आणि त्याच क्षणी एक मोठा अपघात टळतो.

नेमकं काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हिडिओमध्ये दिसतं की, एक स्कूटरस्वार रस्त्याने जात असताना त्याच्या समोर असलेलं मॅनहोल झाकण उघडं असतं. तो वेळेवर स्कूटर थांबवतो आणि सुरक्षित निघून जातो. हे पाहून रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक तरुण त्या उघड्या गटाराचं झाकण व्यवस्थित लावतो.
मात्र, ज्या जागेवर तो तरुण आधी उभा होता, तिथेच काही क्षणांत एक खांब जोरात कोसळतो! जर तो झाकण लावण्यासाठी पुढे गेला नसता, तर त्याच्या डोक्यावर खांब पडला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. हे दृश्य पाहून अगदी अंगावर काटा येतो.

चांगलं कर्म, चांगलं फळ!

हा व्हिडीओ ‘@IM_esha_’ या X (पूर्वीचा Twitter) युजरने शेअर केला असून, त्याची लोकेशन माहिती मिळालेली नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की — चांगले कर्म कधीही व्यर्थ जात नाही. आपल्या लहानशा कृतीमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो, किंवा आपलाच जीव वाचू शकतो, हे हा व्हिडीओ दाखवतो.

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment: PM किसान 2000 हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार – कृषी मंत्रालयाने केले जाहीर

गटाराचं झाकण – छोटं पण महत्त्वाचं!

शहरातील रस्त्यांवर असलेली मॅनहोल झाकणं (गटार झाकणं) फक्त वाहतुकीसाठीच नाही, तर सार्वजनिक सुरक्षेसाठी अत्यंत गरजेची असतात. उघडं झाकण गंभीर अपघात घडवू शकतं. अशा वेळी जागरूक नागरिकांनी स्वतः पुढे येऊन अशी छोटी कामं करणे ही समाजासाठी मोठी सेवा ठरू शकते.

व्हिडीओ पाहा आणि प्रेरणा घ्या!

हा व्हिडीओ केवळ एक व्हायरल क्लिप नाही, तर प्रेरणादायक संदेश देणारी घटना आहे. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात छोटी चांगली कामं करत राहिल्यास, त्याचं चांगलं फळ आपल्यालाच मिळतं.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

👉 तुम्हालाही हा व्हिडीओ आवडला का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा!

Leave a Comment