यावर्षी दहावीचा निकाल कधी लागणार? 10th Result Date 2026 Maharashtra Board

10th Result Date 2026 Maharashtra Board: इयत्ता दहावीची परीक्षा संपल्यानंतर आता सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे निकालाची आणि त्यानंतर होणाऱ्या 11 वी प्रवेश प्रक्रियेची. यंदा शिक्षण विभागाने 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, प्रवेश प्रक्रिया लवकर राबवण्याचे संकेत दिले आहेत. आजच्या या लेखात आपण 11 वी प्रवेशाचे नवे नियम, संभाव्य निकाल आणि आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

11 वी प्रवेश प्रक्रिया यंदा लवकर का?

​मागच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली होती. पहिल्यांदाच ही प्रक्रिया व्यापक स्तरावर राबवल्यामुळे शिक्षण मंडळाला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने यावर्षी ‘धडा’ घेत प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे ठरवले आहे.

महत्त्वाचे बदल:

  • प्रक्रिया कधी सुरू होणार: दहावीची लेखी परीक्षा संपल्यानंतर लगेचच नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
  • निकालानंतरची घाई टाळणार: निकाल लागण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची प्राथमिक नोंदणी (Registration) करून घेण्यावर बोर्डाचा भर आहे.

इयत्ता 10 वीचा निकाल कधी लागणार? (10th Result Date 2026)

​विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. गेल्या वर्षीचा कल पाहता, इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या मध्यावर जाहीर झाला होता.

agricultural loan details in marathi
कृषी कर्ज कसे मिळवावे? शेती कर्जाचे प्रकार, व्याजदर आणि सरकारी योजनांची संपूर्ण माहिती (2026) agricultural loan details in marathi
  • संभाव्य तारीख: यंदाही 10 वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे.
  • अंदाज: साधारणपणे 15 मे ते 25 मे दरम्यान निकाल जाहीर होऊ शकतो.

अकरावी प्रवेशासाठी ‘ही’ तयारी आताच करा

​प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर धावपळ होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी खालील गोष्टींचे नियोजन आत्ताच करणे आवश्यक आहे:

1. करिअरची दिशा ठरवा

​निकाल लागण्यापूर्वीच तुम्हाला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, याचा विचार करा:

  • कला (Arts)
  • विज्ञान (Science)
  • वाणिज्य (Commerce)
  • डिप्लोमा (Diploma) किंवा ITI

2. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव

​ऑनलाईन अर्जासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा:

  • ​आधार कार्ड
  • ​जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • ​उत्पन्नाचा दाखला
  • ​नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer)
  • ​शाळा सोडल्याचा दाखला (LC) – निकालांनंतर मिळेल.

10th Result Date 2026 Maharashtra Board

​शिक्षण विभाग लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर करेल. जशी अपडेट येईल, तशी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राचा अभ्यास करून ठेवावा.

Maharashtra Rain Update
24 ते 28 जून दरम्यान राज्यात तुफान पाऊस! अतिवृष्टीमुळे धरणे भरणार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज Maharashtra Rain Update

हे देखील वाचा: दहावी नंतर नोकरी हवी आहे? ‘हे’ कोर्सेस करा आणि तुमचं करिअर घडवा!

Leave a Comment