नमो शेतकरी निधी उपलब्ध; पैसे वितरण या दिवशी Namo Shetkari Yojana 8th Installment

Namo Shetkari Yojana 8th Installment: राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या थकीत हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता जमा झाला असला, तरी नमो शेतकरी योजनेचा हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून रखडला होता. अखेर यावर राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नमो शेतकरी योजना बंद झाली का?

​अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका होती की ही योजना बंद झाली आहे का? परंतु, विधानसभेच्या अधिवेशनात कृषिमंत्री माननीय दत्तात्रय (मामा) भरणे यांनी स्पष्ट केले की, नमो शेतकरी योजना कोणत्याही प्रकारे स्थगित किंवा बंद झालेली नाही. या योजनेचा हप्ता वितरीत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

8 व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद (Financial Update)

​कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार:

  • ​नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
  • ​या संदर्भातील फाईल आणि माहिती अर्थ विभागाकडे (Financial Department) पाठवण्यात आली आहे.
  • ​पुरवणी मागण्यांमध्ये या निधीला मंजुरी मिळाली असल्याने, अर्थ विभागाकडून निधी वितरीत होण्यात आता कोणतीही अडचण नाही.

खात्यात ₹2000 कधी जमा होणार?

​शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची संभाव्य तारीख आता समोर आली आहे. 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपण्याचे शेवटचे टोक असल्याने, त्यापूर्वी सर्व सरकारी योजनांचे पैसे जमा करणे बंधनकारक असते.

Senior Citizen Card 2026
जेष्ठ नागरिक कार्ड असे काढा ऑनलाईन, मिळतील अनेक लाभ Senior Citizen Card 2026
  • संभाव्य तारीख: 20 ते 23 मार्चच्या दरम्यान हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.
  • अंतिम मुदत: 25 मार्चपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 चा हप्ता जमा होईल, अशी माहिती मिळत आहे.

कोणाला मिळणार लाभ?

​ज्या 91 लाख 18 हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता मिळाला आहे, ते सर्व शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या या हप्त्यासाठी पात्र आहेत. या योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नसते; पीएम किसानचे पात्र लाभार्थी आपोआप या योजनेचे लाभार्थी ठरतात.

नवीन नोंदणीबद्दल महत्त्वाची माहिती

  • वारसा हक्क: जर 2019 नंतर तुमच्याकडे वारसा हक्काने जमीन आली असेल, तर तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी नवीन अर्ज करू शकता.
  • खरेदी खत: जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल (खरेदी खत), तर सध्याच्या नियमांनुसार तुम्ही या लाभासाठी पात्र ठरणार नाही.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मार्च अखेरपर्यंत निधी वाटपाचे नियोजन केले आहे. त्यामुळे 25 मार्चपर्यंत आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवा.

Namo Shetkari Yojana 8th Installment Date (FAQs)

Q. नमो शेतकरी योजनेचा 8 वा हप्ता का लांबला?

प्रशासकीय प्रक्रिया आणि निधीच्या उपलब्धतेमुळे हा हप्ता काही काळ लांबला होता, परंतु आता अर्थ विभागाने त्याला हिरवा कंदील दिला आहे.

Q. नमो शेतकरी योजनेसाठी नवीन अर्ज कुठे करावा?

तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी केल्यास तुम्ही नमो शेतकरी योजनेसाठी पात्र ठरता.

how to fill SIR form Offline
असा भरा ‘एसआयआर (SIR) फॉर्म, अन्यथा मतदार यादीतून नाव होईल कट! जाणून घ्या संपूर्ण माहिती how to fill SIR form Offline

Q. हप्ता जमा झाला की नाही हे कसे तपासायचे?

तुम्ही महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल किंवा पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा बेनेफिशिअरी स्टेटस (Beneficiary Status) चेक करू शकता.

हे देखील वाचा: शिधापत्रिकांवर आता मक्याचे वाटप; 14 जिल्ह्यांत निर्णय लागू

Leave a Comment