Property ची मालकी हवी? मग, ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे अनिवार्य, पहा सविस्तर Proof Of Property Ownership

Proof Of Property Ownership: घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री करतेवेळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे. अनेकवेळा लोक केवळ मालमत्तेचा ताबा घेत असतात किंवा व्यवहारासाठी रक्कम अदा करत असतात, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नोंदणीकृत विक्री कराराशिवाय मालकी हस्तांतरित होऊ शकत नाही.

न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार, फक्त पैसे देऊन किंवा ताबा मिळवून मालमत्तेचा अधिकृत हक्क मिळवता येत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा झाल्यास योग्य कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

➡️ महिलेच्या नावावर घर खरेदी करण्याचे फायदे – बचत 5 ते 10 लाखांपर्यंत! Home Loan Benefits for Women

नियम काय? Proof Of Property Ownership

100 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेसाठी नोंदणीकृत दस्तऐवज आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता हस्तांतरण कायदा, 1882 च्या कलम 54 नुसार, फक्त नोंदणीकृत कराराद्वारेच कायदेशीर हस्तांतरण होऊ शकते. गेल्या फेब्रुवारी महिन्यात न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या व्यवहारांची अधिकृत नोंदणी केल्यावरच त्यांना कायदेशीर मान्यता मिळेल.

PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th Installment: PM किसान 2000 हप्ता 2 ऑगस्टला जमा होणार – कृषी मंत्रालयाने केले जाहीर

नोंदणी का अनिवार्य आहे?

मालमत्ता व्यवहार करतेवेळी अनेकांना प्रश्न पडतो की, नोंदणी करणे अनिवार्य आहे का? उत्तर होय! विक्री कराराच्या नोंदणीशिवाय खरेदीदाराला कोणत्याही प्रकारचे कायदेशीर हक्क मिळू शकत नाहीत.

➡️ होम लोन घेताना या 3 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, बचत होतील पैसे Home Loan Tips

नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे

• मालमत्तेचा आराखडा आणि बांधकाम मंजुरी पत्र
• बिल्डर अथवा विकासकाकडून मिळालेले वाटप पत्र (Allotment Letter)
• मालमत्तेचा कर दाखला (Property Tax Receipt)
• वीज व पाणी बिल (Utility Bills)
• पॉवर ऑफ अटर्नी (Power of Attorney), लागू असल्यास
• पूर्वीच्या व्यवहारांचे दस्तऐवज, जर मालमत्ता पुनर्विक्री होत असेल तर

दरम्यान, मालमत्ता खरेदी-विक्री करतेवेळी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, नोंदणीकृत विक्री कराराशिवाय कोणत्याही खरेदीदाराला मालकी हक्क मिळणार नाही. त्यामुळे व्यवहार करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रांची (Proof Of Property Ownership) पुर्तता करणे बंधनकारक आहे.

Check Ration Card List Online
Check Ration Card List Online: तुमच्या गावाची रेशन कार्ड यादी मोबाईलवरून पाहा 2 मिनिटांत

➡️ Gharkul Yojana Application 2025: घरकुल योजनेसाठी अर्ज मंजूर होण्यास सुरुवात – आवश्यक कागदपत्रांची यादी पाहा!

Leave a Comment